मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेते मधुकर गायकवाड यांचं निधन

मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेते मधुकर गायकवाड यांचं निधन

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

  • Share this:

पुणे, 25 ऑगस्ट : सनईसम्राट दिवंगत शंकररावजी गायकवाड यांचे नातू व शहनाई सुंद्री वादक विद्वान डॉ. पं. प्रमोद गायकवाड यांचे चुलत थोरले बंधू शहनाई वादक सिनेस्टार व जेष्ठ नाट्यकर्मी मधुकर केशवराव उर्फ मधुजी गायकवाड (वय वर्षे 92) यांचे आज राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या मागे मुलगा मंदार, सुन निता व नात अदविका असा परिवार आहे.

मधुकर गायकवाड यांनी युगे युगे मी वाट पाहिली, कुंकवाचा करंडा, आई आहे शेतात, थांब लक्ष्मी कुंकू लावते इ. मराठी सिनेमा स्वयंसिध्दा, लंडनची सून इंडियात हनीमून, गाव बिलंदर बाई कलंदर, सौजन्याची ऐशी तैशी, पती गेले ग काठीवाडी, लावणी भूलली अभंगाला इ. अनेक मराठी नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

त्याकाळच्या सुप्रसिद्ध मराठी नायिका जयश्री गडकर यांच्याबरोबर नायकाच्या भूमिका मराठी चित्रपटात केल्या. तसंच मधू कांबीकर, जयमाला काळे इनामदार यांच्या बरोबर अनेक नाटकांमध्ये त्यांनी कामे केली. रंगभूमीवर प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ते बिस्मिल्ला खाँ यांच्या ढंगाने शहनाई वादन करत असत.

Published by: Akshay Shitole
First published: August 25, 2020, 6:15 PM IST

ताज्या बातम्या