पिंपरीकरांवर नवं संकट, फक्त 30 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

सध्या धरणातील पाणीसाठा केवळ 23.16 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 9 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 06:37 PM IST

पिंपरीकरांवर नवं संकट, फक्त 30 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

अनिस शेख, प्रतिनिधी  

पिंपरी-चिंचवड, 21 मे : तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिक आधीच उष्णतेने हैराण झाले आहेत. त्यात आता नागरिकांच्या तोंडचं पाणी पळेल अशी माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड तसंच मावळकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात अत्यल्प पाणीसाठा राहिला असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना पाण्यासाठी आता काटकसर करण्याची वेळ आली आहे.

सध्या धरणातील पाणीसाठा केवळ 23.16  टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 9 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून यंदा उशिराने दाखल होणार आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत पाणी पुरवण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून रावेत बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. दररोज महानगरपालिका 430 ते 440 एमएलडी( दशलक्ष लिटर) पाणी उचलते. गेल्या पावसाळ्यामध्ये हे धरण शंभर टक्के भरलं होतं.

हेही वाचा : शिवसेना 3 महिन्यांसाठी उपमुख्यमंत्रिपद घेणार नाही - सूत्र

Loading...

परतीच्या पावसानं पाठ फिरवल्याने धरणातील पाणीसाठा कमी होण्यास सुरुवात झाली. उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने सुरुवातीच्या काळात प्रत्येक भागात आठवड्यातील एक दिवस पाणीकपात सुरू केली होती. तर गेल्या 15 दिवसांपासून दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. सध्या धरणात केवळ 23.16 टक्के पाणीसाठा उपलब्‍ध आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 9 टक्क्याने हा पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना काटकसरीने पाणी वापरावं लागणार आहे.

धरणात 602.13 मीटर पाणी असून पाणी पातळी 1975.50 फूट झाली आहे. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यास पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ मावळ आणि पिंपरी-चिंचवडकरांवर येऊ शकते.

VIDEO: उद्धव ठाकरेंची प्रताप सरनाईकांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...