मुंबई, पुण्यात पालेभाज्यांचे भाव कडाडले

मुंबई, पुण्यात पालेभाज्यांचे भाव कडाडले

पावसाच्या तडाक्यात भाजीपाला खराब झाल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे.. याचाच परिणाम नवी मुबंईच्या एपीएमसी मार्केट मध्ये भाजीपाल्याची होणारी आवक घटली आहे.

  • Share this:

मुंबई/पुणे/नाशिक 23 सप्टेंबर : राज्यात सर्वत्र गेल्या १५ दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्याने याचा फटका भाजीपाल्याला बसला आहे. पावसाच्या तडाक्यात भाजीपाला खराब झाल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे.. याचाच परिणाम नवी मुबंईच्या एपीएमसी मार्केट मध्ये भाजीपाल्याची होणारी आवक घटली आहे. दररोजची ६५० ते ७०० गाड्यांची आवक आज ४५० ते ५०० भाजीपाल्याच्या गाड्याची आवकवर आली आहे. यामुळे नवीमुंबईसह मुंबई आणि उपनगरांमध्येही भाजीपाला दरात दुप्पटीने वाढ झालीय. ऐन सणासुदीच्या काळात किरकोळ बाजार पेठेत भाजीपाल्याचे दर १०० रुपयाच्या वर गेलेत.

पुणे आणि नाशिकमध्येही पालेभाज्यांचे भाव कडाडलेत. नागपुरात मात्र, भाज्यांचे दर मुंबई, पुण्याच्या तुलनेत कमी आहेत. कारण विदर्भात कमी पाऊस झाल्याने तिथं भाज्याचं फारसं नुकसान झालेलं नाही.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2017 12:36 PM IST

ताज्या बातम्या