मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पैसा नाही, मन मोठं लागतं! पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीनं कोरोनाग्रस्तांना केली 1 लाखाची मदत

पैसा नाही, मन मोठं लागतं! पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीनं कोरोनाग्रस्तांना केली 1 लाखाची मदत

Pune News: कोरोनाच्या संकटकाळात पुण्यातील एका भाजी विक्रेत्या आजीनं माणुसकीचा धर्म निभावला आहे. त्यांनी आपलं मन मोठं करत कोरोनाग्रस्तांसाठी तब्बल एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देऊ केली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 14 मे: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगानं वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) अत्यंत जीवघेणी ठरत असून दररोज हजारो जणांना आपला जीव गमवावा (Corona patient Death) लागत आहे. कोरोनाच्या संकटकाळातही अनेकजण पैशांच्या मागे धावत विविध औषधांचा आणि वैद्यकीय सुविधांचा काळाबाजार करताना दिसत आहेत. अशा स्थितीत पुण्यातील एका भाजी विक्रेत्या आजीनं मात्र माणुसकीचा धर्म निभावला आहे. त्यांनी आपलं मन मोठं करत कोरोनाग्रस्तांसाठी तब्बल एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देऊ केली आहे.

पुण्यातील संबंधित भाजी विक्रेत्या आजीचं नाव मालन वणवे असून त्या गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजी विक्रीचा व्यावसाय करतात. दरम्यानच्या काळात त्यांनी पै पै कमावून आपल्या नातवांच्या शिक्षणासाठी बॅंकेत 25 हजारांच्या दोन ठेवी ठेवल्या होत्या. पण सध्या पुण्यातील आणि देशातील कोरोना रुग्णांची अवस्था पाहाता त्यांनी या दोन्ही ठेवी मुदतीपूर्वी मोडीत काढल्या आहेत. तसेच आपल्या कुटुंबीयांकडून काही पैसे घेत, एकूण 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली आहे.

विशेष म्हणजे या आजी स्वतः आजारी पेशंट आहेत. आजारी असल्यानंतर रुग्णांची काय अवस्था होत असते, याच जाणीवेतून त्यांनी 1 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊ केली आहे. माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या या आजीनं यावेळी सांगितलं की, 'घरात ठेवलेला पैसा काय कामाचा, जर हाच पैसा एखाद्या गरजूसाठी उपयोगात येणार असेल, तरच या पैशाच खरं मुल्य आहे.

हे ही वाचा-'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार

कोरोना प्रादुर्भावाची स्थिती बिकट बनत चालली असताना, देशातील अनेक बडे कलाकार, उद्योजक, खेळाडू आपला खिशा दाबून ठेवत आहेत. पण मदत करण्यासाठी पैसा नाही, तर मन मोठं लागतं हे या आजीनं दाखवून दिलं आहे. आता सोशल मीडियातूनही या आजीचं कौतुक केलं जात आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Pune