मराठी बातम्या /बातम्या /पुणे /शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यात होणारा 'वशाटोत्सव' अखेर पुढे ढकलला!

शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यात होणारा 'वशाटोत्सव' अखेर पुढे ढकलला!

वशाटोत्सव हा कार्यक्रम यंदा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन आयोजकांनी केलं होतं.

वशाटोत्सव हा कार्यक्रम यंदा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन आयोजकांनी केलं होतं.

वशाटोत्सव हा कार्यक्रम यंदा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन आयोजकांनी केलं होतं.

पुणे, 19 फेब्रुवारी : पुरोगामी विचारांच्या तरुणांना एकत्र करण्यासाठी सुरू झालेला वशाटोत्सव हा कार्यक्रम यंदा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन आयोजकांनी केलं होतं. 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आता अखेर पुढे ढकलण्यात आला आहे.

शिवजयंतीच्या कार्यक्रमाला राज्य सरकारने मर्यादित स्वरूपाचे परवानगी दिली होती. त्यामुळे भाजपकडून वशाट उत्सवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होतं. गेले आठवडाभर हा कार्यक्रम आणि त्याचं आयोजन पुण्यात चर्चा आणि वाद दोन्हीचा विषय होता. कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता वशाटोत्सवाला राज्य सरकारचे मंत्री आणि शरद पवार हजर राहणार का, याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेडनेही दिली होती धमकी

एकीकडे आज दिवसभर शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा नागरिकांना कोरोनाच्या बाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.प्रशासकीय यंत्रणेलाही नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. मात्र वशाटोत्सवमध्ये राज्य सरकारचे जवळपास पाच मंत्री सहभागी होणार होते. त्यामुळे हा कार्यक्रमावरून राज्य सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं.

हेही वाचा - शिवजयंतीलाच राजधानी दिल्लीत शिवसेनेचे आक्रमक आंदोलन, केजरीवालांकडे केली ही मागणी

'एकीकडे शिवजयंती असूनही सर्वसामान्य नागरिकांना शिवजयंतीचा उत्सव साजरा करू नये म्हणून राज्य सरकार बंदी घालते आणि दुसरीकडे त्यांच्या सरकारचे 5 मंत्री आणि आणखी शरद पवार किमान हजारभर लोक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे सरकारच्या मंत्र्यांना एक नियम आणि सर्वसामान्य नागरिकांना एक नियम आहे का,' असा प्रश्न संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी विचारला होता.

पुणे पोलिसांनी जर वशाटोत्सवाच्या कार्यक्रमाला परवानगी दिली तर कार्यक्रमस्थळी निदर्शनं करू अशी धमकीही संभाजी ब्रिगेडने दिली होती. मात्र आता हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Pune (City/Town/Village), Sharad pawar