Home /News /pune /

MNS Raj Thackeray: मनसेच्या आंदोलनातून वसंत मोरे Out, FB वर फोटो पोस्ट करुन दिलं स्पष्टीकरण

MNS Raj Thackeray: मनसेच्या आंदोलनातून वसंत मोरे Out, FB वर फोटो पोस्ट करुन दिलं स्पष्टीकरण

MNS: या संपूर्ण आंदोलन काळात पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More)कुठेच दिसले नाहीत.

    पुणे, 05 मे: राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (Maharashtra Navnirman Sena) मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) यांच्या आवाहनानंतर कालपासून आंदोलन सुरु केलं आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी (MNS activists) मशिदींसमोर हनुमान चालीसाचं (Hanuman Chalisa) पठण केलं. तर काही ठिकाणी स्पीकरवर हनुमान चालीसा लावली. यावेळी अनेक ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. दरम्यान या संपूर्ण आंदोलन काळात पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More)कुठेच दिसले नाहीत. या आंदोलनात ते नॉट रिचेबल होते. मात्र त्यांच्या नॉट रिचेबलची चर्चा रंगताच त्यांनी स्वतः त्या बाबतचा खुलासा केला आहे. वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट करुन आपण कुठे होतो याचा खुलासा केला आहे. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आलो असल्याचं त्यांनी आपल्या फेसबूकच्या पोस्टमध्ये म्हटलं. वसंत मोरे यांची फेसबूक पोस्ट आपल्या फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाले वसंत मोरे पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय, साहेबांच्या आदेशा नंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले. म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार...! राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यातही मोरे गैरहजर 1 मे रोजी राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची औरंगाबाद (Aurangabad) येथे जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेपूर्वी राज ठाकरे आदल्या दिवशी पुण्यात होते. पुण्यातील राहत्या घरून औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले. यावेळी राज ठाकरेंच्या पुण्यातल्या निवासस्थानी मनसे पुणे, मुंबईतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. मात्र यासर्वांमध्ये एक व्यक्ती गैरहजर असल्याचं दिसून आलं होतं. ते म्हणजे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष (former Pune city president) वसंत मोरे. यामुळे त्यांनी मनसे सोडलं असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या.त्यानंतर वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत आपण कुठे असल्याचा खुलासा केला होता. वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "माझी छोटी बहीण आणि जनता वसाहत मधील नागरिकांची कोरोना काळात सेवा करत असताना कोरोना होऊन तरुणपणात दगावलेलेले संपूर्ण जनता वसाहातचे कै. हमिदसर यांची पत्नी आणि पर्वती विधानसभा मतदार संघाची महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची उपविभाग अध्यक्ष नाज हमीद इनामदारही जरा एकटी पडली होती. पोरगी खूप छान काम करते, म्हणून तिच्या एरियात इफ्तारसाठी गेलो होतो.खूप खूश झाली, पोरगी गरीब आहे पण स्वत: शिक्षिका, संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित आहे " नाज " भविष्यात या भागाची लोकप्रतिनिधी नक्की होऊ शकेल". यासोबतच वसंत मोरे यांनी काही फोटोही शेअर केले होते. राणा दाम्पत्याची आज तुरुंगातून सुटका?, सुटकेनंतर थेट गाठणार 'या' भाजप नेत्याचं घर राज ठाकरेंची गुढीपाडवा सभा झाल्यानंतर त्यांनी भोंग्यांविषयी मांडलेल्या भूमिकेनंतर मनसेत मोठी खळबळ झाली होती. पुणे शहराध्यक्षपदी असलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल असहमती दर्शवल्यानंतर काही वेळातच मोरे यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्या नाराजीविषयीच्या चर्चा आधीपासूनच रंगलेल्या आहेत. वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर साईनाथ बाबर यांना पुणे शहराची सूत्र देण्यात आली. त्यावरही वसंत मोरे नाराज झाले होते. या कालावधीत इतर राजकीय पक्षाकडून पक्ष प्रवेशाच्या ऑफर आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर वसंत मोरे यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपण पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: MNS, Raj Thackeray (Politician)

    पुढील बातम्या