Home /News /pune /

मनसेतला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, वसंत मोरे भडकले; थेट वरिष्ठांकडे तक्रार

मनसेतला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, वसंत मोरे भडकले; थेट वरिष्ठांकडे तक्रार

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (Maharashtra Navnirman Sena) अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यात मेळावा आयोजित केला आहे.

    पुणे, 15 मे: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (Maharashtra Navnirman Sena) अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यात मेळावा आयोजित केला आहे. पण कार्यक्रमाच्या पत्रिकेत मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Former Pune city president Vasant More) यांच्या नावाचा उल्लेख नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा वसंत मोरे (Vasant More) यांना डावलल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर वसंत मोरे यांनीही प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. आज पुण्यात मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार केली आहे. या पत्रिकेवर वसंत मोरे यांचं नाव टाकलं नाही आहे. वसंत मोरे यांची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून त्यांनी हे प्रकरण मनसेच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत नेलं आहे. रात्री उशीरा माझ्या हातात कार्यक्रम पत्रिका आली. या कार्यक्रम पत्रिकेत 11 जणांची कोअर कमिटी आहे पण प्रत्यक्षात 11 जणांची नावं आहेत, त्यामध्ये माझं नाव नाही. त्यामुळे मी या मेळ्याव्याला जाणार का नाही याचा निर्णय अजून घेतला नसल्याचं ते म्हणालेत. हा विषय मुद्दाम केला गेला आहे. अशा कार्यक्रमातून मला लांब ठेऊन राज साहेबांच्या मनात माझ्याविषयी राग निर्माण झाला पाहिजे म्हणून अशा गोष्टी केल्या जात आहेत, अशा शब्दांत वसंत मोरेंनी आपला राग व्यक्त केला आहे. शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणं केतकी चितळेला भोवलं, थेट पोलीस कोठडीत रवानगी ही गोष्ट अजून मी राज साहेबांपर्यंत पोहोचवली नाही पण ही गोष्ट शहरातील सिनिअर लोकांपर्यंत पोहचवली आहे. राज साहेबांच्या मागे खूप कामं आहेत, असल्या चिल्लर कामांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असं म्हणत त्यांनी पुणे शहरातील मनसे नेत्यांविषयी नाराजी बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या तीन सभांमध्ये मशिदीवरील भोंग्याचा मुद्द्यावर आवाज उठवला. त्यावरुन राज्यभर तणाव निर्माण झाला. त्यानंतर पुण्यात मनसेकडून महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आलं होतं. दरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन भोंग्यांच्या आवाजाच्या मर्यादेबद्दल आदेश देण्याची मागणी देखील केली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: MNS, Pune, Raj Thackeray (Politician)

    पुढील बातम्या