‘चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला’, पुण्यात ‘सिंगल स्क्रीन’ बंदच राहणार

फक्त 50 टक्के आसन क्षमतेनंच चित्रपटगृह चालवायला परवानगी असल्याने आर्थिक दृष्ट्या ते परवडणारं नाही असं मत अनेक थिएटर मालकांनी व्यक्त केलंय.

फक्त 50 टक्के आसन क्षमतेनंच चित्रपटगृह चालवायला परवानगी असल्याने आर्थिक दृष्ट्या ते परवडणारं नाही असं मत अनेक थिएटर मालकांनी व्यक्त केलंय.

  • Share this:
पुणे 05 नोव्हेंबर:  राज्य सरकारने चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी दिली (Unlock) आहे. मात्र नवे चित्रपट हाती नसल्याने दाखवायचे काय? असा प्रश्‍न थिएटरचालकांसमोर आहे. तसंच फक्त 50 टक्के आसन क्षमतेनंच चित्रपटगृह चालवायला परवानगी असल्याने आर्थिक दृष्ट्या ते परवडणारं नाही असं मत अनेक सिंगल स्क्रिन थिएटर मालकांनी (Single screen cinema) व्यक्त केलंय. आता थिएटर्स सुरू केले तर ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ अशी परिस्थिती होईल असं मत या मालकांनी व्यक्त केलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आर्थिक दृष्ट्या चित्रपटगृह चालवणं हे परवडणारं नसल्याने पुण्यातली सिंगल स्क्रीन थिएटर बंदच राहणार आहेत. या काळात चित्रपटगृहे सुरू केली तर अधिक खर्च होईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. तर सरकारने दिलेल्या नियमानुसार चित्रपटगृहे चालवणं कठीण असून शहरातील सर्वच्या सर्व 15 सिंगल स्क्रीन सिनेमागृह बंदच राहणार आहेत अशी माहिती सिंगल स्क्रिन थिएटर संघटनेचे अध्यक्ष दीपक कुदळे यांनीच ही माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार योगा क्लास आणि इनडोअर स्पोर्टस गेम्स यांनाही मुभा देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्तच्या ठिकाणी हे सर्व सुरू होईल. सिनेमा हॉल सुरू होणार असले तरी तिथे फूड कोर्ट आणि फूड स्टॉक करण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. सामाजिक अंतर आणि शासनाकडून सांगण्यात आलेल्या इतर उपाययोजना करणं बंधनकारक असणार आहे. कोरोना करणार फटाक्यांचा ‘आवाज’ बंद, दिवाळीसाठी खरेदी करण्याआधी ही बातमी वाचा!  एकीकडे, राज्यात मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत विविध गोष्टी सुरू करण्यास पुन्हा परवानगी देण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भावही दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र असं असलं तरीही कोरोनाची दुसरी लाट पुन्हा येऊ शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत खबरदारी आगामी काळातही घ्यावी लागणार आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: