Home /News /pune /

BREAKING : लॉकडाऊननंतर 1 ऑगस्टपासून असं खुलं होणार पुणे शहर, नवीन नियम केले जाहीर

BREAKING : लॉकडाऊननंतर 1 ऑगस्टपासून असं खुलं होणार पुणे शहर, नवीन नियम केले जाहीर

पुणे शहर पुन्हा खुलं होणार असून शहराच्या मिशन बीगिन अगेनसाठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

    पुणे, 31 जुलै : काही दिवसांच्या लॉकडाऊननंतर पुणे शहर पुन्हा खुलं होणार असून शहरासाठीची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात-कंटेन्मेंट झोन्समध्ये अत्यावश्यक सुविधा पुरवणारी दुकाने (दूध विक्री,भाजीपाला ,किराणा,रेशन ) सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान उघडी राहणार आहेत. आधी केवळ सकाळी 8 ते 12 एवढीच या दुकानांना मुभा देण्यात आली होती. काय सुरू...काय बंद? जाणून घ्या - मेडिकल दुकाने, हॉस्पिटल मात्र त्यांच्या वेळेप्रमाणे खुली राहतील - प्रतिबंधित क्षेत्राबाहेरची दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 च्या दरम्यान p1 आणि p2 नियमाप्रमाणे उघडी राहतील - व्यापाऱ्यांची p1 वन p 2 रद्द करण्याची मागणी फेटाळली - मॉल्स आणि व्यापारी संकुले 5 ऑगस्ट पासून सकाळी 9 ते 7 खुली राहतील - मात्र मॉल्स मधील हॉटेल्स ,रेस्टरन्ट ,सिनेमागृहे बंदच राहणार - हॉटेल्स, रेस्टरन्ट मधून खाद्यपदार्थ घरपोच पाठवता येतील - प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अत्यावश्यक सुविधा पुरवणारी दुकाने (दूध,भाजीपाला, किराणा ) सकाळी 9 ते सायंकाळी 7 या दरम्यान खुली राहतील। - 5 ऑगस्ट पासून मोकळ्या मैदानात खेळावयाचे खेळ वगळता इतर खेळ जसे की गोल्फ,नेमबाजी,outdoor बॅडमिंटन ,टेनिस ,मल्लखांब सुरक्षित अंतर राखून खेळता येतील - मात्र जलतरण तलाव बंदच राहतील - टॅक्सी/cab मध्ये वाहन चालक अधिक 3 प्रवासी - रिक्षामध्ये वाहनचालक अधिक 2 प्रवासी - खाजगी चारचाकीमध्ये वाहनचालक अधिक 3 प्रवासी अशी मुभा राहील - दुचाकीवर केवळ वाहनचालक मास्क आणि हेल्मेट परिधान करून परवानगी असेल दरम्यान, मुख्यमंत्री द्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच पुण्यातील विधान भवन सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेसोबत आढावा बैठक पार पडली. "कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणेतील समन्वय महत्त्वाचा असून मृत्यूदर रोखण्यासोबतच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी ऑक्सिजन व आयसीयू बेडस, व्हेंटिलेटरची कमतरता,टेस्टिंगची क्षमता वाढविणे, खाजगी हॉस्पिटलवरचे नियंत्रण,महापालिकेस आर्थिक मदत इ.महत्त्वाचे मुद्दे मांडले होते.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown, Pune (City/Town/Village)

    पुढील बातम्या