मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यासाठी अनलॉक ठरला घातक, 25 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या तिपटीने वाढली

पुण्यासाठी अनलॉक ठरला घातक, 25 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या तिपटीने वाढली

त्याआधी, युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्डे यांनी शुक्रवारी सांगितलं की, 1918-19 च्या स्पॅनिश फ्लूपासून खूप काही शिकलो आहे आणि तशीच कोरोनाची दुसरी लाट नक्कीच भयानक असणार आहे.

त्याआधी, युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्डे यांनी शुक्रवारी सांगितलं की, 1918-19 च्या स्पॅनिश फ्लूपासून खूप काही शिकलो आहे आणि तशीच कोरोनाची दुसरी लाट नक्कीच भयानक असणार आहे.

अनलॉक प्रक्रिया पुण्यासाठी कशी घातक ठरली आहे, हे दाखवणारी एक आकडेवारी समोर आली आहे.

  पुणे, 27 जून : देशभरातील अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी चार टप्प्यांच्या कडक लॉकडाऊनंतर नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अनलॉक-1 च्या या टप्प्यात अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. पुणे शहरातही ज्या भागात कोरोनाने शिरकाव केला नव्हता, असा परिसर आता कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. अशातच ही अनलॉक प्रक्रिया पुण्यासाठी कशी घातक ठरली आहे, हे दाखवणारी एक आकडेवारी समोर आली आहे.

  लॉकडाऊन उठताच 25 दिवसातच पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास तिपटीने वाढली आहे. 25 मार्चला लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर 14 एप्रिलपर्यंत पुणे शहरात 299 कोरोना रुग्ण आढळले होते. तर 15 एप्रिल ते 3 मे या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात पुण्यात 1444 रुग्ण आढळून आले. तर 4 मे ते 17 मे या तिसऱ्या टप्प्यातही पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊन हा आकडा 1641 पर्यंत गेला.

  लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात (18 मे ते 31 मे) पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत या काळात 2909 रुग्ण आढळले. मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच कोरोना संसर्गाने टोक गाठत शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. 1 जून ते 26 जून या अनलॉक-1 च्या काळात शहरात तब्बल 8325 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे अनलॉकची प्रक्रिया पुणे शहरासाठी कशी घातक ठरली, हे या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

  राज्यातील पहिला कोरोना रुग्ण 9 मार्च 2020 रोजी पुण्यातच आढळला, त्यानंतर पुण्यात कशी झाली वाढ?

  लॉकडाऊन 1

  25 मार्च 2020

  कोरोना रूग्णसंख्या - 19

  लॉकडाऊन 2

  14 एप्रिल 2020

  कोरोना रूग्णसंख्या -316

  लॉकडाऊन 3

  3 मे 2020

  कोरोना रूग्णसंख्या -1813

  लॉकडाऊन 4

  17 मे 2020

  कोरोना रूग्णसंख्या - 3517

  लॉकडाऊन 5

  31 मे 2020

  कोरोना रूग्णसंख्या - 6537

  अनलॉक 1.0

  26 जून 2020

  कोरोना रूग्णसंख्या - 14926

  पुणे शहरातील कोरोना हॉटस्पॉट विभागनिहाय कसे वाढत गेले?

  लॉकडाऊन 1

  भवानीपेठ(कासेवाडी), रविवार पेठ

  लॉकडाऊन 2

  भवानीपेठ, ढोलेपाटील रोड, घोलेरोड(ताडीवाला रोड झोपडपट्टी)

  लॉकडाऊन 3

  भवानीपेठ, शिवाजीनगर( पाटील इस्टेट झोपडपट्टी), कोंढवा, हडपसर, वानवडी

  लॉकडाऊन 4

  घोलेपाटील रोड, ढोलेरोड, भवानीपेठ, येरवडा, लक्ष्मीनगर, नागपूर चाळ, वानवडी

  लॉकडाऊन 5(अनलॉक 1.0)

  कसबापेठ-विश्रामबागवाडा, सिंहगडरोड(जनता वसाहत, पानमळा), घोलेपाटील रोड, ढोलेपाटील रोड, बोपोडी, पांडवनगर-जनवाडी

  दरम्यान, पुण्यासह राज्यात आता यापुढे पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसून वाढता मृत्यूदर नेमका कसा आटोक्यात आणायचा हेच आता शासकीय आरोग्य यंत्रणेसमोरचं टार्गेट आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसंच आगामी काळात अँन्टीजीन टेस्ट वाढणार असल्याने पुण्यातली रूग्णसंख्या वाढू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

  संपादन - अक्षय शितोळे

  First published:
  top videos

   Tags: Coronavirus, Pune news