VIDEO : हद्द झाली या पुणेरी जुगाडाची! पालिकेनं पत्रे ठोकून परिसर केला सील; पण...
पुणे महापालिकेनं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा परिसर पत्रे ठोकून सील करून टाकला आहे. पण रहिवासी कॅनॉलवरील पाईपवरून कशा धोकादायक पद्धतीने ये-जा करत आहेत पाहा..
पुणे, 9 जून : पुण्यात कोरोनाव्हायरसची साथ आटोक्यात येतेय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याबरोबर रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अगदी अलिकडेपर्यंत ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या भागातला धोकाही आता वाढला आहे. सिंहगड रोड परिसरातल्या झोपडपट्ट्या आणि बोपोडी हे नव्याने संक्रमित होणारे भाग ठरले आहेत.
सिंहगड रोडवरील पानमळा आणि जनता वसाहतीमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या गेल्या चार-पाच दिवसांत 350 च्या वर पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेनं हा परिसर पत्रे ठोकून सील करून टाकला आहे. पण तिथले रहिवासी कॅनॉलवरील पाईपवरून धोकादायक पद्धतीने ये-जा करत आहेत.
पुण्यात सिंहगड रोडवरील पाणमळा आणि जनता वसाहतीमध्ये तर गेल्या चारच दिवसात कोरोना रूग्णांची संख्या 350 च्या वर पोहोचली. पालिकेनं हा परिसर पत्रे ठोकून सील केला. पण तिथले रहिवासी कॅनॉलवरील पाईपवरून धोकादायक पद्धतीने ये-जा करत आहेत. #coronaviruspic.twitter.com/cRXQWumzM5
एका बाजूला मायक्रोकंटन्मेंट झोन निर्माण करत पालिकेनं हा परिसर सील केला असतानाच खासगी कंपन्या, दुकानं उघडू लागल्याने तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर जायची घाई झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मिळत असलेली सूट आणि अनलॉक नंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून संख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.