मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मोबाइल बँकिंग वापरत नसूनही अकाउंट हॅक; पुण्यातील व्यावसायिकाला 38 लाखांचा गंडा

मोबाइल बँकिंग वापरत नसूनही अकाउंट हॅक; पुण्यातील व्यावसायिकाला 38 लाखांचा गंडा

रिमोट कंट्रोल app मालवेअर अ‍ॅप नसतात, परंतु याचा चुकीचा वापर झाल्यास, या अ‍ॅपद्वारे चुकीच्या व्यक्तीकडे फोनचा अ‍ॅक्सेस गेल्यास ते अतिशय धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे युजरला मोठं नुकसान होऊ शकतं.

रिमोट कंट्रोल app मालवेअर अ‍ॅप नसतात, परंतु याचा चुकीचा वापर झाल्यास, या अ‍ॅपद्वारे चुकीच्या व्यक्तीकडे फोनचा अ‍ॅक्सेस गेल्यास ते अतिशय धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे युजरला मोठं नुकसान होऊ शकतं.

Cyber Crime in Pune: पुण्यातील वाकड परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका व्यावसायिकाला अज्ञात सायबर चोरट्यानं तब्बल 38 लाखांना गंडा (Rs 38 Lakh Fraud) घातल्याची घटना समोर आली आहे.

पुणे, 25 ऑगस्ट : पुण्यातील (Pune) वाकड परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका व्यावसायिकाला अज्ञात सायबर चोरट्यानं तब्बल 38 लाखांना गंडा (Rs 38 Lakh Fraud) घातल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे फिर्यादी व्यावसायिक मोबाइल बँकिंगचा (Mobile Banking) वापर करत नाहीत. तसेच त्यांनी कोणालाही ओटीपी अथवा मेल पाठवला नाही, असं असूनही त्याचं अकाउंट हॅक (Bank Account Hacked) करण्यात आलं आहे. अज्ञात भामट्यानं फिर्यादीच्या दोन अकाऊंटमधून तब्बल 38 लाख 4 हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे.

याप्रकरणी फिर्यादी व्यावसायिकानं पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वाकड पोलिसांनी विविध कलमांतर्गत अज्ञात सायबर दरोडेखोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे कंपनी सल्लागार म्हणून काम करतात. त्याचे एचडीएफसी बँकेत वैयक्तिक आणि फर्मचे असे दोन खाते आहेत. या दोन्ही खात्यातून मिळून अज्ञातानं 38 लाख 4 हजार रुपयांची रक्कम लांबवली आहे. संबंधित घटना 17 जुलै रोजी उघडकीस आली आहे.

हेही वाचा-एकमेकींचा हात सुटला अन् दोघींनी गमावला जीव; नांदेडमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, फिर्यादी व्यावसायिकाला 15 जुलै रोजी बँकेतून रक्कम वजा झाल्याचा एक मेसेज आला होता. एचडीएफसी बँक खात्यातून 2 लाख 14 हजार रुपये वर्ग करण्यात आल्याचा हा मेसेज होता. हा मेसेज पाहिल्यानंतर त्यांनी बँकेतील रक्कम तपासली. तेव्हा त्यांच्या खात्यातून 38 लाख 4 हजार रुपये वर्ग करण्यात आल्याचं त्यांना समजलं. यानंतर त्यांनी त्वरित वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा-...म्हणून प्रेयसीचं हात-पाय अन् मुंडकं केलं धडावेगळं; पुण्याला हादरवणारी घटना

विशेष म्हणजे, फिर्यादी व्यावसायिकानं आपल्या व्यवहारासंबंधित ओटीपी, अलर्ट्स, मेसेज, मेल किंवा बँक खात्याचा तपशील कोणालाही पाठवला नाही. तसेच ते मोबाइल बँकिंग देखील वापरत नाही. असं असूनही अज्ञात चोरट्यानं त्यांच्या दोन्ही बँक खात्यावर डल्ला मारला आहे. फिर्यादीच्या खात्यातील रक्कम नेमकी कुठे गेली, याचा तांत्रिक तपास वाकड पोलीस करत आहे. अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही पुरावा लागला नाही. या प्रकरणात वाकड पोलीस अज्ञात सायबर चोरट्याचा शोध घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Cyber crime, Financial fraud, Pune