मासेमारी मामा-भाच्याच्या जीवावर बेतली, पुण्यात महादेवाच्या तळ्यात बुडून मृत्यू

मासेमारी मामा-भाच्याच्या जीवावर बेतली, पुण्यात महादेवाच्या तळ्यात बुडून मृत्यू

लाखनगाव येथे महादेवाचे तळे आहे. या ठिकाणी आदिवासी ठाकर समाजातील शेतमजूरांचं वास्तव्य आहे...

  • Share this:

पुणे, 6 नोव्हेंबर: मासेमारीसाठी (Fishing) तळ्यात गेलेल्या मामा-भाच्याचा (Uncle and nephew) पाण्यात बुडून मृत्यृ (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे (Pune)जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यात लाखणगाव (Lakhangaon)येथे शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

संजय शिवराम केदारी (वय-32 ) व ऋषिकेश विजय काळे (वय-8) अशी मृतांची नावं आहेत. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिक नागरिकांनी मामा-भाच्याचे मृतदेह बाहेर काढले.

हेही वाचा..पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लाखनगाव येथे महादेवाचे तळे आहे. या ठिकाणी आदिवासी ठाकर समाजातील शेतमजूर शेतात काम करण्यासाठी लाखलगाव येथे मागील चार वर्षापासून स्थायिक आहेत. त्यातील चार जण शेताच्या बाजूला असलेल्या महादेवाच्या तळ्यामध्ये मासेमारी करण्यासाठी गेले होते. 10 ते 12 फूट खोल असलेल्या तळ्यामध्ये गाळात अडकून संजय केदारी आणि त्याचा भाचा ऋषिकेश काळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या तळ्याच्या बाजूलाच शेतात काम करत असणारे विक्रम राजाराम धरम, बाळासाहेब फकिरा धरम यांना रडण्याचा आवाज आला. त्यांना तातडीनं तळ्याकडे धाव घेतली. तळाजवळ ते पोहचल्यानंतर त्यांना दोन जण बुडाल्याची समजले. त्यांनी तात्काळ तळ्यात उडी मारून अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

सदर घटना मंचर पोलिसांनी नवीनच राबवलेल्या सुरनेद्वारे फोन करुन कळवली. ही घटना परिसरातील सर्व नागरिकांना समजली.

हेही वाचा...शौचास गेलेल्या महिलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे केले निकामी, पुण्यातील घटना

गावच्या सरपंच प्राजक्ता रोडे, पोलीस पाटील कल्पिता बोराडे यांनी तात्काळ ही घटना तहसीलदार रमा जोशी व मंचर पोलीस ठाण्यात कळवली. पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पारगाव पोलिस बीट जमादार निलेश खैरे व विठ्ठल वाघ यांनी पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर येथील शासकीय रूग्णालयात पाठवला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 6, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading