पुणे 23 जून: सत्तेत असताना पाच वर्ष उद्धव ठाकरे यांचा शब्द मी खाली पडू दिला नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट मान्य केली. पण निकालानंतर त्यांनी माझे फोनही घेतले नाहीत. बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला. मला सत्ता गेल्याचं दु:ख नाही तर उद्धव ठाकरे (uddhav Thackery ) यांच्या या वागण्याचं दु:ख आहे अशी खंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्याने भाजपला मोठा धक्का बसला. तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वालाही त्यामुळे हादरा बसला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काही महिन्यानंतरही त्याची चर्चा अजुनही सुरूच असते. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांनी Insiderसाठी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खुलासे केले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे.
भाजपची (BJP) काडीमोड घेत शिवसेनेने(Shivsena) राष्ट्रवादी (Ncp)आणि काँग्रेसला सोबत घेत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा (Ajit Pawar)झालेला शपथविधी प्रचंड गाजला होता. त्याविषयीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचा नकार आल्यानंतर राष्ट्रवादीकडूनच सत्तेसाठी सिग्नल मिळाले होते असा खुलासा त्यांनी केला.
फडणवीस म्हणाले, 2019 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्ता बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट सिग्नल होता. दोन बैठका झाल्या होत्या. त्यातील एका बैठकीला मी होतो एकाला नाही. त्या बैठकीनंतरच दोघांनी मिळून पुढे जायचं ठरलं होतं. भाजप सोबत जायचं हा निर्णय काही एकट्या अजित पवारांनी घेतला नाही. हा निर्णय हा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा होता असा खुलासाही त्यांनी केला.
फडणवीसांचा गौप्यस्फोट, भाजपसोबत येण्याचा निर्णय फक्त अजित पवारांचा नाही
फडणवीसांनी नाव न घेता सरळ शरद पवारांच्या (Sharad Pawar) सांगण्यानंतरच अजित पवार भाजपला मिळाले असं थेटपणे सूचित केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजुने असता तर माझं आणि अजित पवारांचे सरकार 100 टक्के टिकले असते असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
लष्कर प्रमुखांनी जखमी जवानांची घेतली भेट; पुढील ऑपरेशनचा घेणार आढावा
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार दोनच वर्षांपूर्वी बनले असते. पण काही गोष्टी जुळून येऊ शकल्या नाहीत असंही ते म्हणाले. सत्तेस असताना उद्धव ठाकरेंची एकही गोष्ट अव्हेरली नाही. त्यामुळे त्यांच्या वागण्याचा सात्विक संताप आला असंही त्यांनी सांगितलं.
Priemere of my interview with Raju Parulekar @rajuparulekar https://t.co/ODyNiRexeo
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 23, 2020
राज ठाकरे यांच्यासोबत व्यक्तिगत मैत्री आहे. त्यांचा मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा आम्हाला मान्य आहे. मात्र परप्रांतियांबाबतची त्यांची टोकाची भूमिका मान्य नाही. भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात का? या प्रश्नावर मात्र त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. त्यांनी टोकाची भूमिका सोडली तर वगळं घडू शकते. मात्र हा प्रश्न राज ठाकरे यांनाच विचारा असंही फडणवीस म्हणाले.
सत्ता गेल्यानंतर दोन दिवस आपली सत्ता गेली हे पटतच नव्हते. मात्र ती जाणीव व्हायला जास्त वेळ गेला नाही असंही त्यांनी सांगितलं.