ठाकरे सरकार फक्त योजना बंद करत सुटलंय का? जयंत पाटलांचा मोठा खुलासा

ठाकरे सरकार फक्त योजना बंद करत सुटलंय का? जयंत पाटलांचा मोठा खुलासा

चुकलेल्या गोष्टी निदर्शनास आल्या तर निर्णय घेऊ. मात्र मागच्या सरकारच्या मागे लागण आणि सूडबुद्धीने वागणार नाही.

  • Share this:

पुणे 21 फेब्रुवारी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या राज्यातल्या  महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या अनेक योजनांना स्थगिती दिलीय. तर काही योजना रद्द करण्याचं सुतोवाच केलं. त्यामुळे भाजपने ठाकरे सरकारवर टीका केलीय. हे सरकार फक्त योजना बंद करत सुटलंय अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. सरकारने योजना बंद करत विकासाला खिळ घालू नये असं मतंही त्यांनी व्यक्त केलं होतं. भाजपच्या या आरोपांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिलंय. सरकारने कुठल्याही योजनांना बंद केलेलं नाही. फक्त काही योजनांचा आढावा घेतला असा खुलासा त्यांनी केला. त्याचबरोबर वादाच्या अनेक विषयांवरही त्यांनी आपली मतं व्यक्त केली.

सरपंच निवड- ग्रामविकास विभागाचा सरपंच निवडीचा कायद्यातला बदल राज्यपालांना कळवलं आहे. त्यांनी तो निर्णय घेतलेला नाही. त्यांनी विधी मंडळात कायदा मांडून मंजूर करावा असे सांगितले आहे त्याप्रमाणे करू. त्यांच्या विषयी काही बोलायचं नसतं. त्यांचा सन्मान राखणे ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडू.

मुख्यमंत्री मोदी भेट- केंद्र सरकारने आमचे सरकार आल्यापासून जीएसटीचा फरक उशिरा द्यायला सुरुवात केली आहे.राज्य सरकारचा केंद्रीय करातला वाटा उशिरा येत आहे. कारण त्यांची आर्थिक अवस्था बरी नाही. ते मुद्दाम करतात असा आरोप  नाही. केंद्र आणि राज्यात संवाद हवा. शेवटी महाराष्ट्र भारतातले राज्य आहे. आम्हाला विश्वास आहे की केंद्र सरकार राज्याकडे दुजाभावाने बघणार नाही.

परीक्षेच्या काळात मशिदीवरचे लाऊड स्पिकर बंद करा, शिवसेना नेत्याचं गृहमंत्र्यांना

NPR - सरकार आघाडीत शिवसेना असलेल्या सरकारचे आहे.आमच्यात आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातले प्रश्न  प्रश्नवलीत सहभागी करू.  मात्र NPR बाबत कोणतेही मतभेद नाहीत. गणती करण्यात कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही.

एल्गार परिषद - एल्गार शनिवार वाड्यासमोर झाली. त्याच्या भाषणांचा भीमा कोरेगावच्या घटनेचा काही संबंध नाही. तरी देखील एल्गार परिषदेच्या काही लोकांवर आरोप ठेवून त्यांची चौकशी करण्यात आली. जेव्हा राज्य सरकार यावर एसआयटी नेमणार अशी चर्चा झाली त्याच दिवशी  एनआयएने तपास आल्याकडे घेतला. त्यामुळे आमच्या मनात शंका निर्माण झाली आहे. मात्र तपास केंद्राकडे गेला तरी राज्य सरकार एसआयटी कडून चौकशी करू शकते. त्यामुळे तो विचार सुरू आहे.

ठाकरे सरकारला मोठा धक्का, राज्यपालांनी फेटाळली महत्त्वाची शिफारस

खडसे चौकशी- आमचे सरकार चौकशी सरकार होऊ नये. चुकलेल्या गोष्टी निदर्शनास आल्या तर निर्णय घेऊ. मात्र मागच्या सरकारच्या मागे लागण आणि सूडबुद्धीने वागणार नाही.

जलयुक्त शिवार योजना - योजनेला स्थगिती नाही.मात्र  निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन महिने स्वतःच्या सोयीचा कार्यकर्त्यांसाठी  काम  करण्यात आले त्याला स्थगिती दिली आहे.जलसंधारण काम चालू राहील. जलयुक्त शिवार हे अनेक काम एकत्र करून दिलेलं गोंडस नाव होतं.

गंमत कराल तर जंमतच करून टाकेल, अजितदादांनी उपटले कार्यकर्त्यांचे कान, VIDEO

काही  तकलादू कामे झाली. अत्यंत सुमार काम झाली त्याबद्दल आम्ही तक्रार केली होती. श्वेतपत्रिका काढण्याचा विचार नाही.सगळ्या गोष्टी श्वेतपत्रिकेतून येतील असे नाही, वेगवेगळ्या पत्रिकेतून येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2020 03:05 PM IST

ताज्या बातम्या