Will Udayanraje Bhosale rejoin NCP?: खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अदजित पवारांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले तसेच उदयनराजे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार का असा प्रश्न उपस्थित झाला.
पुणे, 5 फेब्रुवारी: भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhosale) हे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Dycm Ajit Pawar) भेटीला पोहोचले. उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यात पुण्यातील सर्किट हाऊस येथे ही बैठक झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तसेच उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला. (Will Udayanraje Bhosale rejoin NCP?)उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या वाटेवर?
खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे भोसले यांनी सूचक उत्तर देत म्हटलं, जसा सर्वधर्म समभाव तसाच सर्व पक्ष समभाव मी मानतो.
काय घडलं बैठकीत?
उपुमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रासारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. उदयनराजे भोसले म्हणाले, अजितदादांसोबत विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली.
वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत उदयनराजे भोसले यांनी म्हटलं, वाईन विक्रीचा निर्णय का घेतला हे सरकारलाच विचारा. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असतो त्यामुळे काय घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी हेल्थ इज वेल्थ.
वाचा : BMC Election 2022 : भाजपकडून महापालिका निवडणूक समिती यादी जाहीरडिसेंबर महिन्यात उदयनराजे भोसलेंनी घेतली होती शरद पवारांची भेट
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी 15 डिसेंबर 2021 रोजी शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी काल भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली होती.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होतं. त्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार दिल्लीत होते. याच दरम्यान उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतली. नुकत्याच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली होती त्या अनुषंगाने काही चर्चा झाली का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
असं म्हटलं जात आहे कि, ही एक सदिच्छा भेट होती. नुकताच शरद पवारांचा वाढदिवस झाला आणि त्यावेळी शरद पवारांची भेट घेणं शक्य नाही झाले त्यामुळे आता उदयनराजेंनी दिल्लीत पवारांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून ही एक सदिच्छा भेटच होती असं उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.