अहो, तंदुरी चिकन किंवा कबाब नाही, 'तंदुरी चहा' प्यायलात का कधी?

तंदुर चिकन, तंदुरी कबाब, रोटी म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत, पण पुण्यात दोन तरुणांनी तंदुरी चहा बनवायला सुरुवात केली.

Renuka Dhaybar | Updated On: May 18, 2018 10:59 AM IST

अहो, तंदुरी चिकन किंवा कबाब नाही, 'तंदुरी चहा' प्यायलात का कधी?

हलीमा कुरेशी, पुणे, 18 मे : तंदुर चिकन, तंदुरी कबाब, रोटी म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत, पण पुण्यात दोन तरुणांनी तंदुरी चहा बनवायला सुरुवात केली. आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळतोय.

वाफाळणारा... मडक्यातला गरमागरम चहा कुल्लडमध्ये ओतला जातो आणि तो तुमच्या पुढ्यात ठेवला जातो. असा भन्नाट चहा बनवणारे प्रमोद बानकर आणि अमोल राजदेव हे दोघेही सायन्स ग्रॅज्युएट. पण नोकरी न करता या दोघांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला. गावाकडे शेकोटीत मडकं टाकून त्यात आजीने दिलेल्या हळदीच्या दुधावरून या दोघांना तंदुर चायची कल्पना सुचली.

तंदुरमध्ये खास गावातून बनवून घेतलेल्या मडक्याला भाजलं जातं, आणि कुल्लडमध्ये चहा ओतला जातो. आयटी इंजिनिअर, नोकरदारांबरोबरच गावातून शहरात हरवलेल्यांची या चहाला विशेष पसंती मिळते.

13 मार्च रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर या युवकांनी 'चाय ला' या नावाने तंदुरी चहा सुरु केला. या चहाच्या खास रेसिपीच कॉपीराइट आणि पेटंटही काढलंय. आणि आता यांचा चहा इंटरनॅशनलही झाली आहे कराण, परदेशातूनही फ्रॅंचाईजीसाठी यांना अनेकजण विचारणा करतायत.

खरतर गावाने दिलेल्या या तंदुरी चहाची संकल्पना भन्नाट आहे. उच्च शिक्षण घेऊन युवकांनी संकल्पनेला प्रयोगाची दिलेली जोड आणि तयार झालेला तंदुरी चहा म्हणजे क्या बात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2018 10:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close