सुरू होते लिफ्टचे काम.. डकमध्ये तोल जाऊन दोन कामगारांचा मृत्यू

सुरू होते लिफ्टचे काम.. डकमध्ये तोल जाऊन दोन कामगारांचा मृत्यू

कोथरूड भागात 20 मजली इमारतीच्या लिफ्टचे काम चालू असताना पाळणा तुटून दोन कामगारांचा पडून मृत्यू झाला.

  • Share this:

पुणे,26 ऑक्टोबर:पुण्यातील कोथरूड भागात 20 मजली इमारतीच्या लिफ्टचे काम चालू असताना पाळणा तुटून दोन कामगारांचा पडून मृत्यू झाला. मोहमंद मुस्लिम,(वय-20), मुशीर बुराह रहमान (वय-24) अशी मृत कामगारांची नावे आहेत. दोघे मुळचे पश्चिम बंगालचे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा सोसायटीच्या पुढील बाजूस असलेल्या 20 मजली इमारतीच्या लिफ्टचे काम सुरू होते. शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पाळणा तुटून दोन कामगार डकमध्ये पडले. गंभीर जखमी अवस्थेत दोघांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांचा मृत घोषित केले. या घटनेचा तपास कोथरूड पोलिस करत आहे. ऐन दिवाळीसणादरम्यान ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुणे-सोलापूर मार्गावर विचित्र अपघात..

पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक, ब्लकर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. ट्रकचा चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर जवळील कदमवाक वस्तीजवळ शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास सिमेंटचा ट्रक, ब्लकर आणि कंटेनर या तीन जड वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघातामुळे पहाटे 3.30 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. कदमवाक वस्तीजवळील काळे पेट्रोल पंपजवळ सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक पेट्रोल पंपावर डिझेल भरून रस्ता ओलांडत असताना पुण्याच्या दिशेने येणारा ब्लकर ट्रकला धडकला. ब्लकर सिमेंटच्या ट्रकला धडकल्यामुळे ट्रक दुभाजक ओलांडून पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला जाऊन धडकला. यामध्ये ट्रक आणि ब्लकर पलटी झाल्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. तातडीने पोलिस अपघाताच्या ठिकाणी पोहोचून दोन क्रेनच्या मदतीने ब्लकर आणि सिमेंट या दोन्ही वाहनांना बाजूला केली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ब्लकरचे आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकचा चालक जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ऐन दिवाळीच्या गर्दीमध्ये पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक, ब्लकर आणि कंटेनरची विचित्र अपघात झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

पंतप्रधान असावे तर असे, एकदा हा VIDEO पाहाच!

First published: October 26, 2019, 2:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading