Home /News /pune /

IPL च्या सामन्यांवर सुरू होते बेटिंग, पोलिसांनी आधी तरुणाला पकडले, पण घडले उलटेच...

IPL च्या सामन्यांवर सुरू होते बेटिंग, पोलिसांनी आधी तरुणाला पकडले, पण घडले उलटेच...

पाबळे आणि भुजबळ मंचर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. यातील तक्रारदाराला क्रिकेट बेटिंग चालवतो म्हणून 30 सप्टेंबरला पकडण्यात आले होते.

पुणे, 03 ऑक्टोबर :   पुणे ग्रामीण पोलीस दलातील आंबेगाव तालुक्यातील  मंचर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दोन लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. शुक्रवारी सायंकाळी या दोघांना पकडले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सापळा पथक प्रमुख पोलीस निरीक्षक सुनिल बिले यांनी दिली. क्रिकेट बेटिंग वरून लाच घेतली असू  प्रशांत सुरेश भुजबळ (वय 30 ) आणि कृष्णदेव सुभाष पाबळे (वय 32)अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरजातीय विवाहानंतर पहिल्यांदा माहेरी आली मुलगी; बापाची आत्महत्या मिळालेल्या माहितीनुसार, पाबळे आणि भुजबळ मंचर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. यातील तक्रारदाराला क्रिकेट बेटिंग चालवतो म्हणून 30 सप्टेंबरला पकडण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून 50 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर देखील बेटिंग सुरू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे दोघांनी 1 ऑक्टोबरला 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.  अखेर 2 ऑक्टोबरला 20  हजार रुपयांची लाच घेताना पाबळे आणि भुजबळ दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. आता हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला? हाथरस प्रकरणावरून सेनेचा थेट भाजपला सवाल दरम्यान, महिना भरापूर्वी जवळच्याच नारायणगाव पोलिसात सुद्धा एक सहायक पोलीस निरीक्षक व एक पोलीस हवालदार अशाच पद्धतीने लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले होते. ही चर्चा मागे पडत नाही तोच मंचरचे दोन पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पुणे ग्रामीण पोलिसांची प्रतिमा अजूनच डागाळली गेली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या