पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सिंहाची जोडी

. गुजरात येथील जुनागड जवळ असलेल्या सक्करबाग इथून डिसेंबर २०१६मध्ये सिंहांची जोडी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल झाली. आजपासून ही जोडी सर्वांना पाहता येणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2017 03:29 PM IST

पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सिंहाची जोडी

 हलिमा कुरेशी,09 एप्रिल : पुण्यातल्या सिंहांना लोकप्रियता मिळतेय का मुंबईतल्या पेंग्विन ना अशी स्पर्धा जणू रंगणार आहे. याला कारणही तसंच आहे. गुजरात येथील जुनागड जवळ असलेल्या सक्करबाग इथून डिसेंबर २०१६मध्ये सिंहांची जोडी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल झाली. आजपासून ही जोडी सर्वांना पाहता येणार आहे.

सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास तेजस आणि सुब्बी यांनी केलाय. तेजसची जन्मतारीख ९ ऑगस्ट २००८ आहे तर सुब्बीची ५ मार्च २०१०.  तीन महिने त्यांना नाइटरूममध्ये ठेवण्यात आलं होतं. जंगलाचा राजा आत्ता पुण्यात आल्याने पुणेकरांशी पर्यटकांचं आकर्षण ठरणार आहेत. या नर मादीच्या बदल्यात कात्रज प्राणिसंग्रहालयाकडून पाच विदेशी पक्षी सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला देण्यात आलेत.

आशियाई ब्रीड  असलेले हे नर मादी ६ वर्ष वयाचे असून प्रजननक्षम आहेत. लवकरच आफ्रिकेतील सॅव्हाना प्रदेशातील प्राणी कात्रजमध्ये आणण्याचा प्रयत्न असल्याचं राजीव गांधी प्राणी संग्राहालयाचे संचालक डॉ. जाधव यांनी सांगितलं. केदार कासार यांनी या जोडीला एक वर्षांसाठी दत्तक घेतलं असून या जोडीवर पन्नास हजार दरमहा खर्च येणार आहे.

या नर मादीला म्हशीचं मांस देण्यात येणार आहे.  पांढरा  पट्टेरी वाघ हा कात्रज प्राणिसंग्रहालयाचं आत्तापर्यंतचं आकर्षण बिंदू होता. सिंह देखील आल्याने पर्यटकांबरोबर प्राणीप्रेमींसाठी आनंदाची बाब आहे. जर यशस्ववीरीत्या ही जोडी स्थिरावली तर नक्कीच त्यांच्या नवीन सदस्याचं आगमन होऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2017 02:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...