मुस्लिम महिलांचे प्रश्न सोडवण्याऱ्या 'या' दोघींची यशोगाथा!

कोंढव्यात मुस्लिम महिलांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना स्वावलंबी करण्याचं काम हे फाउंडेशन करतय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 4, 2018 11:57 AM IST

मुस्लिम महिलांचे प्रश्न सोडवण्याऱ्या 'या' दोघींची यशोगाथा!

हालिमा कुरेशी, 04 फेब्रुवारी : मुस्लिम महिलांचे अनेक प्रश्न आहे. शिक्षण, आरोग्य, मानसिक ताण अशा सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून पुण्यात समीना शेख आणि शबाना या महिलांनी फ्युचर फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे. कोंढव्यात मुस्लिम महिलांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना स्वावलंबी करण्याचं काम फाउंडेशन करतय.

अजिजा खान यांना पतीच्या निधनानंतर त्यांना कुठलाच आधार नव्हता. वृद्धपकाळात डायबेटीज ,गुडघेदुखी सारख्या व्याधींनी त्रस्त होत्या पण औषधांना पैसे नसल्याने त्यांना उपचार आणि औषध परवडत नव्हती मात्र पुणे महापालिकेची शहरी गरीब योजना त्यांच्यापर्यंत फ्युचर फाउंडेशननं पोहोचवली आणि त्यांना मोफत औषधोपचार मिळवून दिले.

समाजातील गरीब वर्गातील स्त्रियांचं समुपदेशन करून त्यांना विश्वास देण्याचं काम शबाना आणि समीना करतायत. विधवा परित्यक्ता ,सिंगल पॅरेण्ट असलेल्या अनेक महिलांना समीना आणि शबाना मदत मिळवून देतायत.

मुस्लिम महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना टेलरिंग प्रशिक्षण देणं, त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मार्केट मिळवून देणं, फूड स्टॉल लावून देणं, शहरी गरीब योजना, संजय गांधी निराधार योजना यासारंखी मदत केली जातेय. एवढाच नाही तर अंध अपंगांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचं काम ही संस्था करते.

समीना आणि शबाना यांच्या कामाच्या जोडीला समाजातले दाते मदतीला आले तर मुस्लिम महिलांसाठी अजून काम करण्याची इच्छा या दोघींनी व्यक्त केली आहे. मुस्लिम महिलांच्या शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, मार्केटिंग कौशल्य शिकवण्याच्या कामात स्वयंसेवक म्हणूनही तुम्ही सहभागी होऊ शकता असं आव्हान फ्युचर फाउंडेशनच्या संचालकांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2018 09:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...