मंदिरामागे बसून झोडली दारू पार्टी, नंतर दोघांनी मित्रासोबत जे केलं ते...

मंदिरामागे बसून झोडली दारू पार्टी, नंतर दोघांनी मित्रासोबत जे केलं ते...

आमदाबाद येथे एका मंदिरामागे त्यांनी एकत्रित बसून दारू प्यायली. त्यानंतर त्यांच्यामध्ये त्याच ठिकाणी भांडणे झाली.

  • Share this:

पुणे,28 जून : किरकोळ वादातून दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन मित्रांनी आपल्याच  मित्राचा  खून केल्याची घटना शिरूर तालुक्यातील आमदाबाद इथे घडली. एकनाथ दत्तात्रय जाधव (वय 37)असं मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी दि 25 जून रोजी   एकनाथ दत्तात्रय जाधव (वय 37), वामन विठ्ठल खोपटे ( वय 40) व आप्पा उर्फ रोहित शिवाजी गवळी (वय 23 ) सर्व राहणार जवळा हे तिघे आप्पा गवळी याच्या हिरो होंडा मोटारसायकल क्रमांक एमएच-12-0188 या मोटरसायकलवर बसून आमदाबाद  ता. शिरूर येथे आले होते.

आमदाबाद येथे एका मंदिरामागे त्यांनी एकत्रित बसून दारू प्यायली. त्यानंतर त्यांच्यामध्ये त्याच ठिकाणी भांडणे झाली आणि त्या भांडणानंतर वामन विठ्ठल खुपटे आणि आप्पा उर्फ रोहित गवळी यांनी मिळून एकनाथ जाधव यास मारहाण केली आणि त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर एकनाथ जाधवच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी आमदाबाद रोडवरील पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या नाल्यात मृतदेह फेकून दिला.

चिकनऐवजी पतीनं आणली प्लेन बिर्याणी, संतापलेल्या पत्नीनं उचललं धक्कादायक पाऊल

पारनेर व शिरूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून शिरूर हद्दीत गुन्हा घडल्यामुळे शिरूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केली आहे. या बाबत अनिल एकनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करीत आहे.

दोन महिन्यातली दुसरी घटना  

दोन महिन्यापूर्वी आमदाबाद येथे प्रकाश कारभारी शेंडगे ( वय 28) यांचा दारू पिऊन मित्रांच्या सोबत असताना पाण्यात ढकलून देऊन खुनाची घटना घडली होती. त्यानंतर याच गावात दारूमुळे दुसरी खुनाची घटना घडली आहे.

'काळं सोनं' लुटले पण पळून जाताना व्हॅन कोसळली कॅनॉलच्या खड्यात, तिघे जागीच ठार

दरम्यान, टाकळी हाजी पोलीस चौकीअंतर्गत अवैध दारुच्या धंद्याच्या यापूर्वी अनेकदा बातम्या आल्या असूनही आमदाबाद फाटा येथील धाबे व परमीट रूम सुरूच आहे. याच ठिकाणाहुन  दारू घेऊन या लोकांनी नशा करीत खून केला असल्याची चर्चा आहे. दहा वर्षापूर्वी येथील एका धाब्यामधून दारू पिऊन आलेल्या दारूड्याने चिमुरडीवर बलत्कार केल्याची घटना घडली होती. त्या वेळेस महिलांनी धाब्यावर हल्ला करीत बंद केला होता.

संपादन- सचिन साळवे

First published: June 28, 2020, 1:23 PM IST

ताज्या बातम्या