BREAKING: पिंपरीत मुलाला वाचवताना अग्निशमन दलाचे 2 जवानही ढिगाऱ्याखाली अडकले

BREAKING: पिंपरीत मुलाला वाचवताना अग्निशमन दलाचे 2 जवानही ढिगाऱ्याखाली अडकले

जवानांसह अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यासाठी आले आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी, 01 डिसेंबर : पुण्याच्या पिंपरी दापोडीत ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या एका कर्मचाऱ्याला काढण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाचे 2 जण जवानही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती देण्यात आली आहे. जवानांसह अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यासाठी आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोडीमधील पाण्याच्या टाकीजवळ ड्रेनेजसाठी खड्डा खोदण्याचं काम सुरू आहे. हे काम करणारा एक कर्मचारी खोल खड्ड्यात पडला असल्याची माहिती आहे. त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाकडून आणखी मोठा खड्डा खोदण्यात आला. अग्निशमन दलाचे दोन अधिकारी खड्ड्यात उतरून कर्मचाऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच मोठ्या खड्ड्याची माती तिघांच्या अंगावर पडून कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे तीन जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

मोठी बातमी - हैदराबाद बलात्कार प्रकरणी टायर मेकॅनिकचा पुरावा, 48 तासांत आरोपींना गेम ओव्हर

या तिघांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अग्रिशमन दल आणि पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

 

Published by: Renuka Dhaybar
First published: December 1, 2019, 7:35 PM IST
Tags: pimpripune

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading