मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्याजवळ विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू; VIDEO पाहून येतो भीषणतेचा अंदाज

पुण्याजवळ विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू; VIDEO पाहून येतो भीषणतेचा अंदाज

 पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या (Two died in strange accident in Pune) विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे, 20 ऑक्टोबर : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या (Two died in strange accident in Pune) विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नऱ्हेमधील नवले पुलाच्या (Accident near Narhe village) परिसरात हा गंभीर अपघात झाला. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता ही घटना घडली. अपघाताच्या (Video of Pune accident) ठिकाणचा व्हिडिओ पाहून हा अपघात किती भीषण असेल, याची कल्पना येते.

असा झाला अपघात

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका कंटेनरने पिकअप वाहनाला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की या पिकअप वाहनाची धडक आणखी तीन दुचाकींना बसली. धडक बसल्यानंतर पिकअप वाहनाच्या चालकाचा गाडीवरील ताबा पूर्णपणे सुटला आणि इतर वाहनांना जाऊन गाडी धडकली. या अपघातात अनेकजण जखमी झाले. हायवेवरील नऱ्हे गावाजवळ हा अपघात झाला. यावेळी हायवेपाशीच उपस्थित असणारे गावचे उपसरपंच सागर भूमकर आणि इतर ग्रामस्थ यांनी तातडीनं जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांवर उपचार सुरू आहेत.

हे वाचा- पुण्यात टोळक्याची दहशत; दिवसाढवळ्या दोन दुकानं फोडली, घटनेचा LIVE VIDEO

अपघातांची मालिका

नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने सुसाट जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लागणे अशक्य होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हे उपाययोजना करण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अपघातांची ही मालिका थांबवण्यासाठी रस्ते विभागाने तातडीनं पावलं उचलून या ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे.

First published:

Tags: Accident, Pune