पुणे: यालाच म्हणतात उलट्या काळजाचे! 2 दिवसांच्या जुळ्या बाळांना सोडलं रस्त्यावर

पुणे: यालाच म्हणतात उलट्या काळजाचे! 2 दिवसांच्या जुळ्या बाळांना सोडलं रस्त्यावर

या चिमुकल्या जीवांना या निष्ठूर आईबापांनी कडाक्याच्या थंडीत पाषाण तलावाजवळ उघड्यावर गोधडीत गुंडाळून टाकलं होतं.

  • Share this:

पुणे 14 जानेवारी : पुण्यातल्या पाषाण तलावाजवळ आज सकाळी अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. 2 दिवसांच्या जुळ्या बाळांना आई वडील बेवारस टाकून निघून गेल्याच समोर आलं. या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून तिथे सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांनी आवाजाचा कानोसा घेतल्यावर त्यांना ही जुळी बाळं रडताना दिसून आली. त्यानंतर पोलिसांना बोलवून या बाळांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. या चिमुर्डयांचा टाहो ऐकून तिथ उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच काळजाची घालमेल झाली. पण सामाजिक दबावापोटी किंवा कुठल्याही कारणामुळे या बाळांच्या जन्मदात्यांना मात्र मायेचा पाझर फुटला नाही.

या चिमुकल्या जीवांना या निष्ठूर आईबापांनी कडाक्याच्या थंडीत पाषाण तलावाजवळ उघड्यावर गोधडीत गुंडाळून टाकलं आणि रात्रीच्या अंधारातच आपली ओळख लपवून या चिमुरड्यांना अनाथ सोडून पळ काढलाय.

नाराजी प्रकरणावर 'ठाकरे सरकार'मधल्या सर्वात पॉवरफुल मंत्र्याने दिली प्रतिक्रिया

डोळे उघडून सगळ्यात आधी ज्यांचा चेहरा बघावा त्या मायबापांनी पाठ फिरवल्याने या जुळ्या जीवांचा मायेचा आधार हवाय. सध्या ही मुलं ससून रुग्णालयात उपचार घेताहेत. पोलिसांनी त्यांच्या आईवडीलांचा शोध सुरू केलाय.

VIDEO राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांच्या भावाची मुजोरी, कामगाराला केली मारहाण

गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटना वाढत आहेत. या मागे काय सामाजिक कारणं आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे असं मत विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2020 06:04 PM IST

ताज्या बातम्या