त्या जुळ्यांना रस्त्यावर टाकणारी आई सापडली, प्रेम प्रकरणातून झाली होती मुलं

त्या जुळ्यांना रस्त्यावर टाकणारी आई सापडली, प्रेम प्रकरणातून झाली होती मुलं

त्यामुळे त्या निर्दयी पालकांनी त्या जुळ्यांना रस्त्याच्या कडेला कचऱ्यात टाकलं होतं. त्या आईला आधीच तीन मुली होत्या असंही पोलिसांना तपासात आढळून आलंय.

  • Share this:

पुणे 21 जानेवारी : पुण्यातल्या पाषाण तलावाजवळ 14 जानेवारीला सकाळी अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला होता. 2 दिवसांच्या जुळ्या बाळांना आई वडील बेवारस टाकून निघून गेल्याच समोर आलं होतं. बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून तिथे सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांनी आवाजाचा कानोसा घेतल्यावर त्यांना ही जुळी बाळं रडताना दिसून आली होती. त्यानंतर त्या बाळांना ससुन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्या बाळांच्या निर्दयी मातेचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. सात दिवसानंतप पोलिसांनी त्या मातेचा शोध घेतला आहे. या तपासातून पोलिसांना अत्यंत धक्कादायक माहिती लागली आहे. प्रेमप्रकरणातून त्या महिलेला जुळी मुलं झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे त्या निर्दयी पालकांनी त्या जुळ्यांना रस्त्याच्या कडेला कचऱ्यात टाकलं होतं. त्या आईला आधीच तीन मुली होत्या असंही पोलिसांना तपासात आढळून आलंय.

ही बाळं सापडल्यानंतर लोकांनी पोलिसांना बोलवून या बाळांना ससून रूग्णालयात दाखल केलं होतं. या चिमुड्यांचा टाहो ऐकून तिथ उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच काळजाची घालमेल झाली. पण सामाजिक दबावापोटी किंवा कुठल्याही कारणामुळे या बाळांच्या जन्मदात्यांना मात्र मायेचा पाझर फुटला नाही.

आदित्य ठाकरेंच्या 'ड्रिम प्रोजेक्ट'मध्ये नवी मागणी, यांनाही हवाय रात्रभर परवाना

या चिमुकल्या जीवांना या निष्ठूर आईबापांनी कडाक्याच्या थंडीत पाषाण तलावाजवळ उघड्यावर गोधडीत गुंडाळून टाकलं आणि रात्रीच्या अंधारातच आपली ओळख लपवून या चिमुरड्यांना अनाथ सोडून पळ काढलाय.

साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, शिर्डी आणि पाथरीच्या वादाला नवं वळण

डोळे उघडून सगळ्यात आधी ज्यांचा चेहरा बघावा त्या मायबापांनी पाठ फिरवल्याने या जुळ्या जीवांचा मायेचा आधार हवाय. सध्या ही मुलं ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहितीही दिली जातेय.

First published: January 21, 2020, 6:10 PM IST
Tags: pune crime

ताज्या बातम्या