मराठी बातम्या /बातम्या /पुणे /राज्यात दोन मुख्यमंत्री एक 'मातोश्री'वर आणि दुसरे.., चंद्रकांत पाटलांचा टोला

राज्यात दोन मुख्यमंत्री एक 'मातोश्री'वर आणि दुसरे.., चंद्रकांत पाटलांचा टोला

'मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी'

'मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी'

'मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी'

पुणे, 26 जुलै : 'माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडूनच दाखवा' असं थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. त्यांच्या या आव्हानानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'तुम्ही इतर वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन दाखवा' असा पलटवार केला आहे. तसंच, राज्यात दोन मुख्यमंत्री आहे, असा टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला.

पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर सडकून टीका केली. 'चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहे. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी', असे थेट आव्हानच पाटील यांनी दिले.

पंतप्रधानांच्या स्वप्नावर उद्धव ठाकरेंनी फेरले पाणी,फडणवीसांसह भाजपला मोठा हादरा

'महाराष्ट्रात सध्या दोन मुख्यमंत्री आहे. एक जे 'मातोश्री'वर बसून काम करत आहे. आणि दुसरे हे राज्यभर फिरत आहे', असं म्हणत त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता पाटील यांनी टोला लगावला.

'सातवीच्या मुलाला सध्याच्या राजकीय स्थितीवर निबंध लिहायला सांगितला तरी ते लिहितील. सरकार जाणार नाही हे कार्यकर्त्यांना निश्वास देण्यासाठीच वक्तव्य उद्धव ठाकरे करत आहे. मुळात तिघे ही भांडतात, मग परत काहीच झाल नाही अस सांगतात', अशी टीकाही पाटील यांनी केली.

तसंच, 'अधिकाऱ्यांना 10 ॲागस्टपर्यंत बदल्या करताना विश्वास देण्यासाठी सरकार जाणार नाही हे सांगत आहेत. पण कोंबड झाकून ठेवला तरी सुर्य उगवायचा राहत नाही. उद्धव ठाकरेंनी कद्रूपणा सोडावा विरोधी पक्षाच्या आमदारांशी बोलावं आणि पुण्याची चिंता करावी' असंही पाटील म्हणाले.

'...पण स्टिअरिंग माझ्याच हातात', उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतील 5 मोठ्या गोष्टी

त्याचबरोबर अजित पवार अपयशी ठरत आहेत. हे दाखवायचे प्रयत्न सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे. आता हे कोण करत आहे हे तुम्ही पाहा, असं म्हणून चंद्रकांत पाटलांनी  उद्धव ठाकरेंकडे बोट केले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीतून  भाजपवर चांगलीच सडकून टीका केली.  'भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोट्स करूनच बघावे, मी भाकीत कसे करणार? तुम्ही करून बघा. फोडाफोडी करून बघा.' असं थेट आव्हानाच मुख्यमत्र्यांनी भाजपला दिले होते.

First published:
top videos

    Tags: BJP, Chandrakant patil