पुणे, 26 जानेवारी : पुणे-भीमाशंकर इथे प्रजासत्ताक दिनी दोन्ही भावांचा बाथरुममध्ये मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकत्र अंघोळ करत असताना २ सख्ख्या भावांचा बाथरुममध्ये गुदमरून मृत्यू झाला.
दरवाजा बंद असल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास झाला आणि दोघेही बेशुद्ध झाले. बराच वेळ मुलं बाहेर आली नाहीत. त्यामुळे घरच्यांनी दरवाजा तोडला. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचा डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
अभिषेक नवनाथ पांडे (१६) आणि आदित्य नवनाथ पांडे (१२) अशी या मृत भावंडांची नावं आहेत. दोघेही भाऊ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेत सकाळी ध्वजारोहणाला जाण्याच्या तयारीत होते. उशीर होऊ नये यासाठी दोघे एकाच वेळी बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी गेले.
बाथरूमचा दरवाजा बंद असल्याने मोकळ्या हवेअभावी दोघेही गुदमरले असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे दोघेही बेशुद्ध पडले. बराच वेळ झाल्यावरही मुलं बाहेर न आल्याने त्यांची आई त्यांना पाहण्यासाठी गेली. यावेळी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.
भावंडांना उपचारासाठी घोडेगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आपल्या दोन्ही मुलांना प्रजासत्ताक दिनी अशा पद्धतीने गमावल्याने पांडे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
झेंडा वंदनाला जाताना NCC तरुण-तरुणीने गमावले प्राण, अपघातात जागीच मृत्यू
आजच्या प्रजासत्ताक दिनी लातूरच्या अहमदपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी निघालेल्या 2 तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
गोविंद दहिफले आणि पूजा भोसले असं मृत तरुण आणि तरुणीचं नाव आहे. हे दोघे दुचाकीवरून झेंडा वंदन आणि एनसीसीच्या परेडसाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
रस्त्यावर दुचाकी वेगात स्लीप झाली आहे. त्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अहमदपुर येथील महाविद्यालयात हे दोघेही 11वीमध्ये शिकत होते. प्रजासत्ताक दिनी आपल्या मित्रांना अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमधील गोविंद दहिफले हा किनगाव इथं राहणारा होता तर पूजा भोसले ही कोळवाडी इथं राहणारी विद्यार्थीनी आहे. या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
हा घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून दोघांचाही मृतदेह ताब्यात घेतला आणि नंतर तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली आहे. त्यानुसार पोलीस आता तपास करत आहेत. तर आपल्या तरुण मुलांना असं अकाली गमावल्याने दोघांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण कॉलेजवर शोककळा पसरली आहे.
VIDEO : 'हम चलते है ऐसे तो दिल दुश्मन के हिलते है...' जवानांनी गायलं गाणं