मुलाने पुणे पोलिसांकडेच मागितला मुलीचा नंबर, मिळालं पुणेरी स्टाइल उत्तर!

मुलाने पुणे पोलिसांकडेच मागितला मुलीचा नंबर, मिळालं पुणेरी स्टाइल उत्तर!

सोशल मीडियावर सक्रिय असेलल्या पोलिसांकडे एका मुलीचा नंबर मागितल्यानंतर पुणे पोलिसांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जानेवारी : देशभरात पोलिसांकडून लोकांच्या मदतीसाठी  आणि संपर्कासाठी सोशल मीडियाचा वापर जास्त केला जात आहे. अनेकदा पोलिसांकडून अभिनव आणि विनोदी पद्धतीने लोकांना इशारा दिला जातो. त्यामुळे लोकांना नियम सहजपणे समजण्यासाठी मदत होते. यामुळे सोशल मीडियावर पोलिसांच्या या क्रिएटीव्हिटीची सातत्याने चर्चा होत असते. त्यातही पोलिसांकडून अनेकदा मजेशीर रिप्लायही दिले जातात. सध्या अशाच एका खोडसाळपणा करणाऱ्या ट्विटर युजरला दिलेला पुणे पोलिसांचा रिप्लाय चर्चेत आहे.

एका महिलेने ट्विटवरव पुणे पोलिसांना टॅग केलं होतं. तिने धानोरी पोलिस स्टेशनचा संपर्क क्रमांक पोलिसांना विचारला होता. त्यावर पुणे पोलिसांनी नंबर शेअर केला. त्यावर एका मुलाने पुणे पोलिसांकडे त्या मुलीच्या नंबरची मागणी केली. मुलाच्या या मागणीला पोलिसांनी पुणेकर स्टाइलने मोजक्याच शब्दांत उत्तर दिलं आहे.

ट्विटरवर '@abirchiklu' अशा नावाने अकाउंट असलेल्या व्यक्तीने कमेंट करताना म्हटलं होतं की,'मला मुलीचा नंबर मिळू शकेल का, प्लीज?' मुलाच्या या कमेंटनंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचेच मन जिंकले.

पुणे पोलिसांनी त्यावर म्हटलं की, सर सध्या तरी आम्हाला तुमच्या फोन नंबरमध्ये इटरेस्ट आहे. आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला मुलीचा नंबर कशाला हवा आहे. तुम्ही थेट मेसेज करा. तुमच्या प्रायव्हसीचा आम्ही आदर करतो असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

नागपूर पोलिसांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतला! ट्विटरला असा दिला प्रतिसाद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune
First Published: Jan 13, 2020 12:14 PM IST

ताज्या बातम्या