पीएमपीएमएल बसमुळे फाटली पँट; प्रवाशानं भरपाईसाठी केली तक्रार

एमपी बसच्या खराब सीटमध्ये अडकून पँट फाटल्यानं संजय शितोळे या प्रवाशानं बस थेट चौकीत नेली आणि तक्रार दाखल करून १000 रूपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2018 01:19 PM IST

पीएमपीएमएल बसमुळे फाटली पँट; प्रवाशानं भरपाईसाठी केली तक्रार

18 जानेवारी : पीएमपी बसच्या खराब सीटमध्ये अडकून पँट फाटल्यानं संजय शितोळे या प्रवाशानं बस थेट चौकीत नेली आणि तक्रार दाखल करून १000 रूपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पीएमपीएमएलची अवस्था खिळखिळी असतानाही रोज सुमारे 7 ते ९ लाख प्रवासी यातून प्रवास करतात. पण तरीही या बसेसची अवस्था काही सुधारलेली दिसतं नाही. वारंवार तुटके सीटस्, फाटलेले पत्रे यांच्या तक्रारी करूनही कुठलीच दखल घेतली जात नाही.

तुकाराम मुंडे यांनी पदभार घेतल्यावर स्थिती बदलेल असं वाटत असतानाच मुंडे यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांआधी तुकाराम मुंडे यांनी पीएमपीएमएलच्या 158 कामगारांना गैरहजर राहिल्यामुळे घरचा रस्ता दाखवला. पण बसेसच्या अवस्थेवर तक्रारी करुनही त्यावर कारवाई का होत नाही असा खरा सवाल आहे. या सगळ्याला वैतागून आता प्रवाशी संजय शितोळ यांची तुटक्या सीटमध्ये अडकून पँट फाटल्याने पँट भरून मिळावी म्हणून आख्खी बसचं पोलीस चौकीत नेली.

या सगळ्या प्रकारात शेवटी संजय शितोळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आणि 1000 रूपयांची भरपाईची ही मागणी केली आहे. शितोळे यांच्या प्रमाणेच त्रस्त इतर प्रवाशांनी शितोळेंच समर्थन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2018 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...