जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune News : नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा, उद्धव ठाकरेंवरील त्या टीकेनंतर तृतीयपंथी आक्रमक; पुण्यात गोंधळ

Pune News : नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा, उद्धव ठाकरेंवरील त्या टीकेनंतर तृतीयपंथी आक्रमक; पुण्यात गोंधळ

नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेनंतर तृतीयपंथी आक्रमक झाले असून त्यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले की, मी जे बोललो ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टेटमेंटचा आधार घेऊन बोललो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 12 जुलै : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेनंतर पुण्यात तृतीयपंथी आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला असून पुण्यात मध्यरात्रीपासून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना हे बघा हिजड्यांचे सरदार असं वक्तव्य केलं होतं. पुण्यात मध्यरात्रीपासून बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथींकडून रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करताना यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येतेय. नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जात नसून पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. Nagpur News : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघात, अखेर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी तृथीयपंथीयांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तृतीयपंथी समाजाने माझं वाक्य व्यवस्थित ऐकले नसेल. मी जे बोललो ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टेटमेंटचा आधार घेऊनच असंही नितेश राणेंनी स्पष्ट केलं. नितेश राणे यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा तृतीयपंथीयांनी दिला आहे. तृथीयपंथीयांनी आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर रास्ता रोको करणाऱ्या काही तृतीयपंथीयांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामुळे मोठा गोंधळही आंदोलनस्थळी झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात