मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अपघात होताच क्षणात पेटली स्पोर्ट्स बाईक, आगीचा Live Vido; पिंपरी-चिंचवडमध्ये तरुण तरुणीचा मृत्यू

अपघात होताच क्षणात पेटली स्पोर्ट्स बाईक, आगीचा Live Vido; पिंपरी-चिंचवडमध्ये तरुण तरुणीचा मृत्यू

भीषण अपघातात बाईकवरील तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

भीषण अपघातात बाईकवरील तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

भीषण अपघातात बाईकवरील तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

पिंपरी- चिंचवड, 18 ऑक्टोबर: सकाळी सकाळी एका भीषण अपघाताची (Horrific Accident) बातमी समोर येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) हा अपघात झाला आहे. हा अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही (CCTV camera) कैद झाली आहेत.

भरधाव वेगाने स्पोर्ट्स बाईक (Sports Bike)चालवताना हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात बाईकवरील तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

हेही वाचा- हिजाब घातला म्हणून मुंबईत रेस्टो बारमध्ये महिलेला नाकारला प्रवेश, Watch Video

हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून केवळ एका सेकंदात झालेला हा अपघात किती भीषण होता ते या दृशांमध्ये दिसून येत आहे.

हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त बाईकनं क्षणात पेट घेतला. अपघात झाल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या तरुण - तरुणीच्या डोक्याचे अवशेष काही मीटर पर्यंत लांब फेकले गेले.

अपघातात खडकी परिसरातील 23 वर्षीय आर्यन नरेंद्र परमार आणि भंडाऱ्याची रहिवासी असलेली 21 वर्षीय श्वेता अशोक गजभिवे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त बाईकनं फरफटत जाऊन दुसऱ्या बाईकला धडक दिल्याने त्यावरील दोन बहिणीचाही अपघात होऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहे. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती निगडी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार धुमाळ यांनी दिली आहे.

स्पोर्टस बाईक रायडरचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र या अपघातामुळे जुन्या पुणे - मुंबई हायवे वरील रोड सेफ्टीचा  प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

हेही वाचा- T20 World Cup Live Streaming: IND vs ENG पाहा कधी आणि कुठे पाहता येणार मॅच? 

जुन्या पुणे - मुंबई हायवे वर ठिकठिकाणी डिव्हायडरवरील रिप्लेक्टर दिसत नसल्यानं अशा प्रकारचे अपघात घडत असल्याचं नागरिकांच म्हणणं आहे.

First published:
top videos

    Tags: Accident, Pune, Pune accident