लग्नसराईच्या मौसमात जेजुरी दुमदुमली, भाविकांमुळे मोठी वाहतुक कोंडी

लग्नसराईच्या मौसमात जेजुरी दुमदुमली, भाविकांमुळे मोठी वाहतुक कोंडी

आज वैशाख महिन्यातील शेवटचा रविवार, लग्नसराईचा महिना. वैशाख महिना संपून अधिक जेष्ठ महिना दोन दिवसांवर आला आहे. नवदाम्पत्याना कुलदैवताचं दर्शन घेण्यास आज आणि उद्या हेच दोन दिवस आहेत.

  • Share this:

13 मे : आज वैशाख महिन्यातील शेवटचा रविवार, लग्नसराईचा महिना. वैशाख महिना संपून अधिक जेष्ठ महिना दोन दिवसांवर आला आहे. नवदाम्पत्याना कुलदैवताचं दर्शन घेण्यास आज आणि उद्या हेच दोन दिवस आहेत. त्यामुळे जेजुरीत खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची रांग लागली आहे.

त्यात उन्हाळ्याची सुट्टी आहे. त्यामुळे राज्यभरातून भाविक देवदर्शनासाठी जेजुरीला येत आहेत. यामुळे जेजुरीत येणाऱ्या सर्व मार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने लोक वादावादी करण्यावर उतरले आहेत.

आपली गाडी पुढे जावी म्हणून एकमेकांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची मोठी धावपळ सुरू आहे.

 

First published: May 13, 2018, 5:19 PM IST

ताज्या बातम्या