मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोयाटो क्वालिसला अज्ञात वाहनाची जोरात धडक, एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोयाटो क्वालिसला अज्ञात वाहनाची जोरात धडक, एकाचा मृत्यू

डाव्या बाजूने जोरात धडक दिल्याने क्वालिस कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि  भरधाव कार पुढे जाणाऱ्या कंटेनरवर आदळली.

डाव्या बाजूने जोरात धडक दिल्याने क्वालिस कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार पुढे जाणाऱ्या कंटेनरवर आदळली.

डाव्या बाजूने जोरात धडक दिल्याने क्वालिस कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार पुढे जाणाऱ्या कंटेनरवर आदळली.

आनिस शेख, प्रतिनिधी

पुणे, 18 फेब्रुवारी : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) एका टोयोटा क्वालिस कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. टोयाटो क्वालिस कारही पुण्याहून मुंबईकडे येत होती. एक्स्प्रेस वेवर लेन कटिंग करून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने डाव्या बाजूने जोरात धडक दिल्याने क्वालिस कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि  भरधाव कार पुढे जाणाऱ्या कंटेनरवर आदळली. त्यामुळे कारमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर  आणखी एक जण जखमी झाला आहे. राहुल दणाणे (वय 30 ) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सिद्धेश पाटील हा जखमी झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे दोघेही अंधेरी मुंबई येथील राहणारे आहेत. किलोमीटर 16/500 येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आयबी पेट्रोलिंग अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे पथक घटनास्थळावर दाखल होत त्यांनी मदत कार्य सुरू केले.

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मयत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चौक येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन महामार्ग वरून बाजूला हटवल्याने वाहतूक कोंडी सुरळीत झाली आहे. महामार्गावरील  सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे अपघातास कारणीभूत असलेल्या इतर वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Hit and run, Maharashtra, Mumbai case, Pune, Road accident