मित्रांसोबत फिरायला आलेल्या पर्यटकाचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू

सोमनाथ हा तरुण आपल्या मित्रांसमवेत भोरगिरी येथे फिरायला आला होता.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 08:51 PM IST

मित्रांसोबत फिरायला आलेल्या पर्यटकाचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू

रायचंद शिंदे,(प्रतिनिधी)

भीमाशंकर,18 सप्टेंबर:भोरगिरी येथील भोरगडाच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्याच्या पाण्यात बुडून एका पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिक व पोलीस पाटील यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे.

सोमनाथ विठ्ठल तांगडे (वय-23, रा.वडोद तांगडे, ता.भोकरदंण, जि.जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमनाथ हा तरुण आपल्या मित्रांसमवेत भोरगिरी येथे फिरायला आला होता. बुधवार सकाळपासून हे सर्व पर्यटक भोरगड, कोटेश्वर अशा सर्व परीसरात फिरुन आल्यानंतर सोमनाथ हा भोरगडाच्या पायथ्याला असणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात उतरला होता. खडक निसरटा असल्याने सोमनाथचा पाय घसरुन तो पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

भीमाशंकर व भोरगिरी परिसरात निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात. मात्र, आनंदाच्या भरात धोकादायक ठिकाणाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहे. त्यामुळे या परिसरात आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कुठल्याही सुविधा उपलब्ध होत नाही.

भीमाशंकर व भोरगिरी परिसर पर्यटनासाठी पर्यटकांना भुरळ घालतात, असे असताना एकीकडे पर्यटन वाढत आहे. मात्र या पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांना आपात्कालीन वेळी या परिसरात कुठल्याही सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

Loading...

VIDEO Ak 56 बाळगणाऱ्या गँगस्टरला असं संपवलं... एन्काउंटर स्पेशालिस्टने स्वतः सांगितला किस्सा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2019 08:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...