मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणेकर नियम करी उणे, भुशी डॅमवर पुन्हा पर्यटकांचा उच्छाद, VIDEO

पुणेकर नियम करी उणे, भुशी डॅमवर पुन्हा पर्यटकांचा उच्छाद, VIDEO

कोरोनाचे नियम पायदळी तुडवत पुणेकर बिनधास्तपणे भुशी डॅमच्या पायऱ्यांवर लोळत होते.

कोरोनाचे नियम पायदळी तुडवत पुणेकर बिनधास्तपणे भुशी डॅमच्या पायऱ्यांवर लोळत होते.

कोरोनाचे नियम पायदळी तुडवत पुणेकर बिनधास्तपणे भुशी डॅमच्या पायऱ्यांवर लोळत होते.

आनिस शेख, प्रतिनिधी

लोणावळा, 10 जुलै : पुण्यात (Pune corona cases) कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पर्यटनस्थळावर कडक अंमलबजावणीचे आदेश पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले असताना सुद्धा पर्यटन स्थळावर मोठ्याप्रमाणात गर्दी होतानाच पाहायला मिळत आहे. लोणावळ्यातील भुशी डॅमवर (Bhushi Dam Lonavla) पुन्हा एकदा पर्यटकांनी गर्दी केली होती. पण, न्यूज 18 लोकमतने बातमी प्रसारित केली असता पोलिसांनी पर्यटकांना पिटाळून लावले आहे.

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे. पण, लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यामुळे पुणेकर याचा पुरेपूर फायदा उचलत असल्याचं दिसून येत आहे.

लोणावळा खंडाळा तसंच मावळ तालुक्यातील इतर पर्यटन स्थळावर पर्यटक बिनदिक्कतपणे दाखल होत आहेत. पर्यटन नगरीत पर्यटकांना येण्यास मनाई नसून पर्यटन स्थळावर जाण्यास पर्यटकांना मनाई असल्याबाबतच्या सूचना पोलिसांकडून स्पष्टपणे पर्यटकांना देण्यात आले आहेत.

OMG! 32 नाही तर 82; 17 वर्षीय तरुणाच्या जबड्यातील दात पाहून डॉक्टरही शॉक

तरीदेखील सर्व नियम धाब्यावर बसवत तसंच पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जात पर्यटनस्थळावर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. कुठेच शासनाकडून देण्यात आलेल्या त्रिसूत्रीचे पालन होतानाचा दिसून येत नाही.

पाकिस्तानची पुन्हा फजिती, फास्ट बॉलरला इंग्लंडहून जबरदस्तीनं घरी पाठवलं

आज लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांनी गर्दी केली होती. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत पुणेकर बिनधास्तपणे भुशी डॅमच्या पायऱ्यांवर लोळत होते. याबद्दलची बातमी प्रसिद्ध होताच भुशी डॅमवर पोलीस कर्मचारी दाखल झाले. पर्यटनबंदीचा आदेश डावलणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी घरचा रस्ता दाखवला. सर्व पर्यटकांनी पोलिसांनी हुसकावून लावले.  भुशी डॅमवर पोलीस कर्मचारी ठाण मांडून उभे राहिले असून पर्यटकांना डॅम परिसरात येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.

First published:

Tags: Pune