पुणे, 26 मार्च : गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पुण्यातील मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यामधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला होता. मात्र आता खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरे वसंत मोरे यांच्यासाठी पुण्यात आले आहेत. त्याला कारण देखील खास आहे. वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून गुजरवाडी येथे उभारण्यात आलेल्या डॉग पॉंडला राज ठाकरे भेट देणार आहेत.
राज ठाकरे देणार डॉग पाँडला भेट
मनसे नेते वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून गुजरवाडी येथे डॉग पाँड उभारण्यात आले आहे. या डॉग पाँडचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होतं. मात्र मध्यंतरी राज ठाकरे आजारी असल्यामुळे ते या डॉग पाँडच्या उद्घाटन कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. गेल्या आठवड्यात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते, त्याच वेळी त्यांनी वसंत मोरे यांना भेट देण्याचा शब्द दिला होता. राज ठाकरे यांचं काल रात्री पुण्यात आगमन झालं. ते आज सकाळी दहा वाजता वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या डॉग पाँडला भेट देणार आहेत. डॉग पाँडची पहाणी करून ते पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत.
नवी मुंबईत आज संभाजीराजे छत्रपतींची तोफ धडाडणार; करणार मोठी घोषणा!
काय आहे डॉग पाँडची संकल्पना?
मनसे नेते वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून हे डॉग पॉंड उभारण्यात आले आहे. डॉग पाँड हे पुणे महापालिका मान्यता प्राप्त कुत्रा, मांजर निर्बीजीकरण केंद्र असून, हे राज्यातील सर्वात मोठं केंद्र आहे. आज राज ठाकरे हे या डॉग पाँडची पहाणी करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray