हाहाकार.. पुण्यात पार्टी करायला गेलेले तीन मित्र वाहून गेले गाडीसकट

हाहाकार.. पुण्यात पार्टी करायला गेलेले तीन मित्र वाहून गेले गाडीसकट

कात्रज परिसरात राहणारे तीन मित्र एका पार्टीसाठी पुण्यालगतच्या कोळेवाडीतील हॉटेलमध्ये गेले होते.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार,(प्रतिनिधी)

पुणे,27 सप्टेंबर: पुण्यात बुधवारी रात्री ढगफुटीसदृष झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: हाहाकार उडाला आहे. एका रात्रीत पावसाने 17 जणांचा बळी घेतला आहे तर तब्बल 60 जनावरे दगावली आहेत. पार्टी करायला गेलेले कात्रजचे तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. गाडीसकट तिघे वाहून गेले आहेत. काळेवाडी परिसरात त्यांची वॅगनार कार आणि मोबाइलचा सापडला आहे. मात्र, तरुणांचा अद्याप शोध लागलेला नाही. सुरज वाडकर, निखील चव्हाण, गणेश शिंदे अशी या बेपत्ता तरुणांची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, कात्रज परिसरात राहणारे तीन मित्र एका पार्टीसाठी पुण्यालगतच्या कोळेवाडीतील हॉटेलमध्ये गेले होते. परत येताना तिघेही त्यांच्या वॅगनार या गाडीसकट वाहून गेले. काळेवाडी परिसरात एका नाल्यातील झाडात गाडी अडकून पडलेली सापडली. शुक्रवारी काही अंतरावर एक मृतदेह पोलिसांना सापडला आहे. सुरज वाडकर असी मृतदेहाची ओळख पटली आहे. सुरज वाडकर याचा मृतदेह जांभुळवाडीच्या तलावात सापडला आहे. इतर दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांकडून शोधकार्य केले जात आहे.

पूरग्रस्तांच्या रोषामुळे चंद्रकांत पाटलांना घेतला काढता पाय..

पुण्यात आलेल्या महापूरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. अशी बिकट परिस्थिती उद्भवली तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात आले नव्हते. ते नवी दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीत उपस्थित होते. याबद्दल त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये असंतोषही निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटील यांनी शु्क्रवारी पूरग्रस्तभागाची पाहणी केली. मात्र, त्यांनी पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. चंद्रकांत पाटील टांगे वाला कॉलनीत पोहोचले असता त्यांच्याविरुद्ध नागरिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. अरण्येश्वर कॉलनी परिसरातही त्यांना तोच अनुभव आला. त्यामुळे पाटील यांना काढता पाय घ्यावा लागला.

फोटो काढण्यासाठी आलात काय?

सगळं झाल्यावर तुम्ही आता फक्त काही फोटो काढण्यासाठी आलात काय, असा सवाल संतप्त पूरग्रस्तांनी चंद्रकांत पाटील यांना केला. पाटील यांनी पूरग्रस्तांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना नागरिकांनी जुमानले नाही. शेवटी पाटील घटनास्थळावरून निघून गेले.

पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, विरोधकांना माझी आठवण होणे हे स्वाभाविकच आहे. मी पूर आला त्या रात्रीपासून जिल्हाधिकारी बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर यांच्या संपर्कात होतो. आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून उघडपणे फार करता येत नाही. विरोधकांनी टीका करावी. त्यांचे ते कामच आहे. सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना जे निकष लावले जे GR काढले ते पुण्यातही लागू करण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांनी केली. 12 वर्षांत एवढा पाऊस झाला नाही. डोंगरावरून पाणी आले. कुणालाच अंदाज आला नाही. ना शासन, प्रशासन, हवामान विभाग ना मीडियाला. पुण्यात नाले ,ओढे वळवले गेले, अतिक्रमणे झाली याची समिती नेमून चौकशी करणार, अहवाल आल्यावर कारवाई करणार अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

VIDEO:भुजबळांच्या वेळी कुठे होता? चंद्रकांत पाटलांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 05:32 PM IST

ताज्या बातम्या