Home /News /pune /

किरण गोसावीचा आणखी एक प्रताप समोर, पुण्यात 3 गुन्हे दाखल

किरण गोसावीचा आणखी एक प्रताप समोर, पुण्यात 3 गुन्हे दाखल

गोसावीवर आता पुण्यातच फरासखान्यासह आणखी तीन ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहे.

गोसावीवर आता पुण्यातच फरासखान्यासह आणखी तीन ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहे.

गोसावीवर आता पुण्यातच फरासखान्यासह आणखी तीन ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहे.

पुणे, 01 नोव्हेंबर : मुंबई ड्रग्स प्रकरणात (mumbai drug party case) एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे पुण्यात पंच किरण गोसावीचा  (kiran gosavi) आणखी एक प्रताप समोर आला आहे. पुणे पोलिसांनी (pune police) त्याच्या घराची झडती घेतली असता आणखी काही तरुणांना त्याने फसवल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात आणखी 3 ठिकाणी गुन्हे दाखल करम्यात आले आहे. मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी पंच म्हणून काम पाहणाऱ्या किरण गोसावीला पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्याचे आणखी कारनामे समोर आले आहे. तरुणांना परदेशात नोकरीच्या आमिष दाखवून त्याने चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाला फसवलं होतं. न्या. चंद्रचूड यांचं मोठं वक्तव्य! 'जाहिरात मागे घ्यायला लागणं असहिष्णुता' पुणे पोलिसांनी किरण गोसावीच्या ठाण्यातील घराची आणि ऑफिसची झडती घेतली असून तपासादरम्यान त्याने चिन्मय देशमुखसारख्याच अनेक तरूणांना फसवल्याचं समोर आलंय. गोसावीवर आता पुण्यातच फरासखान्यासह आणखी तीन ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहे. त्याच्याविरोधात लष्कर आणि वानवडी  पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन असे मिळून चार फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.  परदेशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणाला 3 लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी किरण गोसावीला अटक केली आहे. याआधी त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात 3 वर्षांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तो फरार होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस बजावली होती. अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडल्यानंतर त्याने ज्यांना ज्यांना फसवले त्यांनी समोर येऊन तक्रार द्यावी असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं होतं. त्यानंतर आता त्याचे काही प्रताप समोर आले आहे. NEET Result 2021: विद्यार्थ्यांनो, NEET 2021 निकाल जाहीर; असं बघा score card दरम्यान, एनसीबीने किरण गोसावीचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांशी अद्याप कोणताही संपर्क साधलेला नाही, अशी माहिती झोन वनच्या डिसीपी प्रियंका नारनवरे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना दिली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या