पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे जागेवरच ठार

पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे जागेवरच ठार

गाडी डिव्हायडर ओलांडून दुचाकीला धडकली. दुचाकीवरील तिघांचा या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.

  • Share this:

सुमीत सोनवणे,(प्रतिनिधी)

दौंड,31 ऑक्टोबर: पुणे-सोलापूर महामार्गवर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. पुण्याहुन सोलापूरच्या दिशेने जाणारी इर्टिका गाडीचा (MH12 NP 0613) टायर फुटल्याने डिव्हायडर ओलांडून पुणेच्या दिशेने चाललेल्या दुचाकीस्वरांना धडकली. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील मळद येथे दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

इर्टिका गाडीचा टायर फुटताच चालकाचा वाहनावरीस ताबा सुटला. गाडी डिव्हायडर ओलांडून दुचाकीला धडकली. दुचाकीवरील तिघांचा या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. तिघेही कर्जत येथील असल्याची माहिती मिळाली आहे. इर्टिकामधील दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांना दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आंबेनळी घाटात 30 फूट दरीत कोसळली बस, 27 प्रवासी जखमी

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात गेल्या वर्षी दापोली कृषी विद्यापिठाची बस कोसळून झालेल्या भीषण अपघात झाला होता. या अपघाताची पुनरावृत्ती बुधवारी रात्री झाली. अक्कलकोट-महाड एसटी बस दरीत कोसळली. सुदैवाने बस एका आंब्याच्या झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातात बसचालकासह 27 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर महाडमधील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पावसाळ्यात रस्ता खचल्याने वरंध घाट बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आंबेनळी घाट हा एकमेव पर्याय असल्याने बसची वाहतूक या मार्गाने वळवण्यात आली आहे. अक्कलकोट-महाड एसटी 30 फूट खोल दरीत कोसळली. ही बस आंब्याच्या झाडाला अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दुर्घटनेची माहिती पोलादपूर शहरामध्ये पोहोचताच अनेक तरुणांनी तातडीने घटनास्थळी मदत कार्यासाठी धाव घेतली. यावेळी भोर येथून शाळेतील मुलांना सोडून परत येणारा पोलादपूर येथील वैभव शंकर मपारा या जीपचालकाने त्याच्यासोबतच्या प्रवाशाच्या मदतीने बसमधील प्रवाशांना कमरेच्या बेल्टच्या मदतीने बाहेर काढण्यात यश मिळवले. बसचालक एन.पी. खरात यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. वृद्ध महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला तातडीने महाड येथे हलवण्यात आले आहे.

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

First published: October 31, 2019, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading