दगडाने ठेचून एकाची हत्या.. मृतदेहाला घेऊन दुचाकीवरून जात होते तिघे, तितक्यात...

थेऊरमध्ये एकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने मारेकऱ्यांना अटक केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 07:35 PM IST

दगडाने ठेचून एकाची हत्या.. मृतदेहाला घेऊन दुचाकीवरून जात होते तिघे, तितक्यात...

पुणे,20 सप्टेंबर: थेऊरमध्ये एकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने मारेकऱ्यांना अटक केली आहे.

एका दुचाकीवर जात होते चार जण..

शुक्रवारी (20 सप्टेंबर) पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास थेऊर गावातील हेड कॉन्सटेबल संदीप सुरेश देवकर हे आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत खासगी वाहनाने रात्री गस्तीवर होते. एका दुचाकीवर चार जण जात असल्याचे त्यांना दिसले. यावेळी गाडीवरील एक व्यक्तीचे डोके प्लास्टिक गोणीने झाकले होते आणि त्याच्या अंगावर रक्तही दिसत होते. हा प्रकार पाहून हेड कॉन्सटेबल देवकर यांना शंका आली. त्यांनी सोबत असलेल्या 2 होमगार्डच्या मदतीने त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिस पाठलाग करत असल्याचे समजताच आरोपींनी थेऊर फाट्याजवळ गोणीने झाकलेल्या व्यक्तीला टाकून तेथून पळ काढला. त्यानंतर देवकर यांनी मोठ्या शिताफीने त्यांचा पाठलाग करत आरोपींना पकडले.

चौकशीत सत्य आले समोर..

येरवडा परिसरातील संगमवाडी रोडवर किरकोळ कारणावरुन मृत भारत राजू बढे (वय- 24., रा. कासारवाडी, पुणे) याला दगडाने ठेचून खून केल्याचे मारेकऱ्यांनी कबूल केले आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. अशोक संतोष आडवाणी (वय-22, रा. पिंपरी, पुणे ), अक्षय दिलीप पवार (वय-19, रा. वरवंट,दौंड) आणि विजय संतोष पवार (वय-19, रा. वरवंट, दौंड) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.

Loading...

VIDEO :पत्ताच्या बंगल्याप्रमाणे कोसळली मुंबईत 4 मजली इमारत LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2019 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...