पुण्यातील तज्ज्ञांचा दावा; कोरोना महासाथीत हे सामान्य औषध ठरतंय परिणामकारक

पुण्यातील तज्ज्ञांचा दावा; कोरोना महासाथीत हे सामान्य औषध ठरतंय परिणामकारक

अभ्यास आणि निरीक्षणातून पुण्यातील तज्ज्ञांनी ही माहिती समोर आणली असून विशेष म्हणजे गंभीर रुग्णांवर या औषधाचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे

  • Share this:

पुणे, 30 ऑगस्ट :देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यात राज्यातही अद्याप कोरोनावर नियंत्रण आणण्यात सरकारला यश आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर देशभरातही विविध ठिकाणी कोरोना आजारावर अभ्यास केला जात आहे. त्यातच पुण्यातील काही तज्ज्ञांनी यावर महत्त्वपूर्ण दावा केला आहे.

पुण्यातील काही संशोधकांनी कोरोना संसर्गात रक्त पातळ करण्याचं औषध या महासाथीच्या उपचारात उपयुक्त असल्याचा दावा केला आहे. पुण्यातील काही वैद्यकीय तज्ज्ञांनी काही ट्रायल्स केले आहेत, त्याचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आल्याचा दावा केला आहे.

लो मॉलेक्यूलर वेट हेपारिन (LMWH) नावाच्या या लशीच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा हॉस्पिटलाइजेशन पीरियड कमी करण्याचा आणि त्याच्यांवरील प्रभावी उपचारात मदत मिळाली आहे. याशिवाय यातून अनेक रुग्ण बरे झाले आहेत.

अनेक रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसल्यानंतर तज्ज्ञांनी याच्या उपचाराबाबत मीडियाशी बातचीत केली. तज्ज्ञांनी दावा केला आहे की, SARS-CoV2 व्हायरसमुळे रुग्णाच्या शरीरातील काउंटर ब्लड इंफ्लेमेशन आणि ब्लड क्लॉटिंगची समस्या सुरू होते. ही समस्या रोखण्यासाठी हे औषध प्रभावी दिसत आहे.

हे वाचा-पुण्यात धक्कादायक घटना, भर रस्त्यातून तरुण तरुणीला पळवलं आणि...

इटलीतील रुग्णाच्या अभ्यासामुळे मिळाली मदत

पुण्यातील तज्ज्ञ सुभल दीक्षित यांनी दावा केला आहे की, इटलीतून आलेल्या रुग्णाच्या शवविच्छेदन रिपोर्टमध्ये हे स्पष्ट केलं आहे की, कोरोना व्हायरसमुळे शरीरात छोटे छोटे ब्लड क्लॉट्स तयार होतात. अशात डॉक्टरांनी भारतात रक्त पातळ करण्याच्या औषधांचा वापर सुरू केला आहे. गंभीर रुग्णांवर या औषधाचा उपयोग सुरुवातीपासून होत आहे. मात्र आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे याचा वापर वाढवला आहे. या औषधांचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 30, 2020, 7:51 PM IST

ताज्या बातम्या