मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Video: पेप्सी आणि कोकाकोलापेक्षाही जुनी आहे पुण्यातली ही कोल्ड्रिंक कंपनी!

Video: पेप्सी आणि कोकाकोलापेक्षाही जुनी आहे पुण्यातली ही कोल्ड्रिंक कंपनी!

X
Pune

Pune News : पेप्सी आणि कोकाकोलापेक्षा जुनी कोल्ड्रिंक कंपनी ही पुण्यात असून ती आजही उत्तम पद्धतीनं सुरू आहे.

Pune News : पेप्सी आणि कोकाकोलापेक्षा जुनी कोल्ड्रिंक कंपनी ही पुण्यात असून ती आजही उत्तम पद्धतीनं सुरू आहे.

    नीलम कराळे, प्रतिनिधी

    पुणे, 4 मार्च : कोल्ड्रिंक ही अनेकांच्या आवडती गोष्ट आहे. पेप्सी, कोकाकोला यासारखे अनेक कोल्ड्रिंकचे फ्लेवर्स सध्या बाजारात आहेत. पण यापेक्षाही एक जुनी कंपनी पुण्यात सुरू झाली होती. त्या कंपनीचा आजही चांगला व्यवसाय सुरू आहे. याबात अनेकांना माहिती नाही. कोणती आहे ही कंपनी? ही कंपनी सुरु होण्याचा इतिहास काय आहे? आज ती कशी सुरू आहे? याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

    138 वर्ष जुनी कंपनी

    अर्देशी इराणी यांनी पुण्यामध्ये 1884 साली सोडा वॉटर कोल्ड्रिंक कंपनी सुरू केली. ही भारतातीलच नाही तर जगाती सर्वात जुन्या सोडा वॉटर कंपनीपैकी आहे. अर्धेशीर यांचे वंशज असलेल्या मार्झबान इराणी यांनी ही कंपनी कशी सुरू झाली याची माहिती सांगितली आहे.

    इराणमधून भारतामध्ये आलेले अर्देशीर इराणी हे तेव्हा पुण्यातील कॅम्प परिसरात राहत असतं. त्या भागात ब्रिटीश सैन्य मोठ्या प्रमाणात होते. तेथील एका रेस्टॉरंटमध्ये इंग्रज सैनिकांमध्ये हाणामारी सुरू असल्याचं त्यांनी पाहिलं. या भांडणाचं कारण त्यांनी विचारलं. त्यावेळी इंग्रजांना त्यांच्या विस्कीसोबत सोडा वॉटल लागतो. तो सोडा वॉटर वेळेवर आला नाही म्हणून हे भांडण सुरू असल्याचं त्यांना समजलं. हा सोडा वॉटर त्यावेळी भारतामधील एखाद्या शहरातून नाही तर थेट इंग्लंडमधून आयात करण्यात येत असे.

    पुण्यातील सर्वात जुन्या चर्चमध्ये आहे एक दुर्मीळ गोष्ट, पाहा Video

    ...आणि सुचली बिझनेस आयडिया!

    अर्देशीर यांना त्याचवेळी बिझनेसची आयडिया सुचली. त्यांनी कॅम्पमधील एका छोट्याशा जागेत स्वत:ची सोडा कंपनी सुरू केली. त्यांनी मशिन्स आणल्या. सोडा बनवण्याचं तंत्रज्ञान शिकून घेतलं. सुरुवातीला ते स्वत:च्या हातांनीच सोडा बनवत असत. त्यानंतर ते दिवसाला किमान 10 ते 15 पेट्या सोडा विकत असत. प्रत्येक पेटीमध्ये तब्बल 24 बॉटल होत्या.

    त्यांचा सोडा लोकप्रिय झाल्यानंतर अर्देशीर यांनी त्यामध्ये विविध फ्लेवर्स आणले. त्याकाळी इंग्लंडमधून फ्लेवर्स आणले जात. पण अर्देशीर यांनी पुण्यातील कंपनीमध्ये हे काम सुरू केले. सध्या त्यांच्या सोडा कंपनीमध्ये 13 प्रकारचे फ्लेवर्स मिळतात. कदाचित हा जगातील सर्वात जास्त फ्लेवर्सचा सोडा आहे, असं मर्झबान यांनी सांगितले. अर्देशीर इराणी यांचा हा सोडा अतिशय पॉवरफुल मानला जातो.

    साधा सोडा, आईसक्रीम सोडा, ग्रीन ऍपल, पीच, पायनॅपल , काला खट्टा, ऑरेंज, लेमन, जीरा मसाला, जिंजर सोडा, रास्पबेरी अशा 13 प्रकारच्या चवीत हा सोडा उपलब्ध आहे. 19 व्या शतकात अर्देशीर कोळसे जाळून त्यापासून कार्बन डाय ऑक्साईड वायू तयार करत. त्यानंतर तो व्यवस्थित फिल्टर आणि अन्य प्रक्रिया करुन त्यापासून सोडा बनवत असत.  त्या. त्यांच्या उद्योगाने तिथल्या चौकाचे नाव सरबतवाला चौक असे पडले.' अर्देशीर अँड सन्स' कंपनी आजही याच चौकातून काम करते.

    ' सध्या जुन्या इराणी/ पारशी हॉटेलातच फक्त हे कोल्ड्रिंक मिळतात. त्याचबरोबर पारशी आणि इराणी लोकांच्या समारंभात हे कोल्ड्रिंक असते.  आम्ही अजूनही काचेच्या बॉटलमध्येच हे सगळे कोल्ड्रिंक विकतो. यापूढील काळात हा व्यवसाय आम्हाला आणखी वाढवायचा आहे.'  असे मर्झबान इराणी यांनी स्पष्ट केले.

    First published:
    top videos

      Tags: Local18, Pune