भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघातून तृतीयपंथीय लढवणार निवडणूक

निवडणूक लढण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेससह बहुतांश राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. त्यात तृतीयपंथीयही मागे नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 06:56 PM IST

भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघातून तृतीयपंथीय लढवणार निवडणूक

गोविंद वाकडे,(प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड,23 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्राला दिवाळीपूर्वीच नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. राज्यात 21 ऑक्टोबरला विधासभेसाठी मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे.

निवडणूक लढण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेससह बहुतांश राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. त्यात तृतीयपंथीयही मागे नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून चक्क एक तृतीयपंथीय निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. तशी त्याने घोषणाही केली आहे.

चिंचवड हा सेना भाजप च वर्चस्व असलेला मतदार संघ आहे. या मतदारसंघातील अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे नताशा लोखंडे नामक तृतीयपंथीयाने सांगितले. आपल्याला उमेदवारी दिल्याचे जनहित लोकशाही पार्टीने जाहीर केले असल्याचे नताशाने सांगितले आहे.

चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप हॅटट्रिक करणार का?

Loading...

चिंचवड मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व आहे. दोन वेळा निवडून आलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आता तिसऱ्या वेळीही विजय मिळवणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर शिवसेनेकडून राहुल कलाटे रिंगणात उतरतील. तेव्हा मात्र लक्ष्मण जगताप यांच्यापुढे आव्हान निर्माण होईल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इथे लढायलाही अनेक जण उत्सुक आहेत.

पिंपरी विधानसभेच्या तुलनेत हा मतदारसंघ सुशिक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर उद्योजक, व्यावसायिक आणि आयटी क्षेत्रात काम करणारे मतदारही इथे जास्त संख्येने आहेत. 2009 मध्ये चिंचवड मतदारसंघ काँग्रेसकडे आला त्यामुळे राष्ट्रवादीचे लक्ष्मण जगताप इथे अपक्ष म्हणून लढले. 2014 मध्ये ते भाजपकडून लढले आणि आमदार झाले. त्यांनी शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला होता.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघात युतीला 96 हजार 758 मतांचं विक्रमी मताधिक्य मिळालं. त्यामुळे आताही लक्ष्मण जगताप यांना विजयाची खात्री आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक उमेदवारांची नावं चर्चेत असली तरी लक्ष्मण जगताप यांना आव्हान देईल असा तगडा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही. असं असलं तरी चिंचवडमधली मुख्य लढत राष्ट्रवादीविरुद्ध भाजप अशीच होणार आहे.

VIDEO:नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...