पुणे, 30 जुलै: पुण्यातील सॉलसबरी परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका ड्रायफ्रुटच्या दुकानावर चोरट्यांनी दरोडा (Robbery in Pune) टाकल्यानंतर, त्यांच्या हाती काहीच पैसे लागले नाहीत. त्यामुळे निराश चोरट्यांनी दुकानातील काजू बदामावर ताव मारल्याचं (thieves eat cashew nuts) समोर आलं आहे. चोरट्यांनी दुकानात बसूनचं शेकडो रुपयांचे काजू बदाम खाल्ले आहेत. याप्रकरणी पीडित दुकानदारानं स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांचा प्रताप ऐकून पोलीसही चक्रावले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
धवन बाबुलाल श्रीमाल असं फिर्याद दाखल करणाऱ्या दुकानदाराचं नाव आहे. सॅलसबरी पार्क परिसरातील रोहन अपार्टमेंटमध्ये फिर्यीदी धवन याचं ड्राय फ्रुट्स विक्रीचं दुकान आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या दुकानावर डल्ला मारला आहे. चोरटे दुकानाचं शटर उचकटून आत शिरले मात्र दुकानातील गल्ल्यात काहीच पैसे आढळले नाहीत.
हेही वाचा-चार महिन्यांपासून सुरू होता गैरप्रकार; कंटाळून नगरमधील 2 बहिणींनी केलं विषप्राशन
सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित चोरट्यांनी दुकानात बसून काजू आणि बदामवर ताव मारला आहे. भूक भागल्यानंतर चोरट्यांनी तब्बल 9 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या दुकानात चोरी झाल्याचं लक्षात येताच धवन बाबुलाल श्रीमाल यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित चोरट्यांबद्दल अद्याप कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरट्याचा तपास करत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा-पत्नीला भेटायला आला अन् गजाआड पोहोचला; पुण्यातील सराईत गुन्हेगार अटकेत
दुसरीकडे, सॅलसबरी पार्क परिसरात चोरट्यांनी आणखी एका दुकानावर डल्ला मारला आहे. कोंढवा परिसरातील लुल्लानगर परिसरातील रहिवासी असणारे फईम नसीम मलिक (वय 23) यांचं सॅलसबरी पार्क परिसरात लॉरिअस युनिसेक्स सलून शॉप आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मलिक आपल सलून शॉप बंद करून घरी गेले होते. पण रात्री अज्ञात चोरट्यांनी शॉप उचकटून दोन मोबाईल, हेअर किंटींग ट्रीमर असा 24 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Robbery