Home /News /pune /

या 3 गोष्टींमुळे बळीराजाने संकटावर केली मात; काही एकरांमध्ये घेतो लाखोंचं उत्पन्न

या 3 गोष्टींमुळे बळीराजाने संकटावर केली मात; काही एकरांमध्ये घेतो लाखोंचं उत्पन्न

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

व्हिडीओमध्ये शेतकऱ्याने कोणत्या तीन गोष्टींचा पाठपुरावा केला याबद्दल सांगितलं आहे.

  नंदुरबार, 20 जानेवारी : शेतकरी जगला तर आपण जगू. कधी अवकाळी पाऊस तर दुष्काळ अशा या ना त्या संकटातून शेतकऱ्याला मार्ग काढावा लागतो. त्यामुळे त्याच्यासमोर आव्हानं खूप मोठी आहेत. मात्र असं असलं तरी अनेक शेतकरी यातून बाहेर येण्यात यशस्वी ठरले. अनेकांनी अभूतपूर्व यश मिळवलं. अशाच एका शेतकऱ्याची कहाणी नवी उमेदने (Navi Umed Post) आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. जाणून घेऊया त्यांचा अनोखा प्रवास... 'अवकाळीसारख्या प्रत्येक संकटावर मात करून शेतकरी जगला पाहिजे, त्यानं अधिक उत्पन्न घेतलं पाहिजे,'' पृथ्वीराज रावल सांगत होते. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या सारंगखेडा गावचे सरपंच पृथ्वीराज रावल. खान्देशात शेतकरी घेत असलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत सरासरी त्यांना दुप्पट ऊसाचा उतारा मिळाला आहे.
  रावल यांनी १० एकर क्षेत्रात विक्रमी ८४० टन उसाचं उत्पादन घेतलं असून त्याला घसघशीत दर मिळाला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी लागवड केली. त्याची तोड लागली नोव्हेंबर २०२१ मध्ये. एकरी ४० हजार याप्रमाणे ४ लाख रुपये त्यांना खर्च आला. त्यातून ८४ टन प्रति एकर उसाचं उत्पादन त्यांना मिळालं असून विक्रीतून १९ लाखांपर्यंत उत्पन्न मिळालं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला असं उत्पन्न मिळावं, अशी इच्छा ते व्यक्त करतात. रावल यांच्या मते,उसासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि आंतर मशागत व्यवस्थापन या ३ गोष्टी महत्त्वाच्या असतात.
  रावल सांगतात, '' एरवी ४० ते ५० टन अशी एकरी सरासरी असते, मला दुप्पट उत्पादन मिळालं, ते सेंद्रिय शेतीची कास धरल्यामुळे. बदलता काळ, हवामानातील बदल लक्षात घेता,पुढल्या काळात सेंद्रिय शेतीला पर्याय नाही. पारंपरिक शेतीसोबत शेतकऱ्यांनी आधुनिकतेची वाट धरायलाच हवी.''
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: नवीन प्रयोग

  पुढील बातम्या