• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • 'विजय' नावावरून झाला घोळ, आमदाराच्या कर्मचाऱ्याला केले मृत घोषित

'विजय' नावावरून झाला घोळ, आमदाराच्या कर्मचाऱ्याला केले मृत घोषित

मृत दाखवलेच पण त्यांच्या नावापुढे त्यांचा मोबाईल सुद्धा टाकायला विसरले नाहीत.

  • Share this:
जुन्नर, 24 एप्रिल : पुणे (Pune) शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. ग्रामीण भागात रुग्णालयात बेड मिळत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या मृतांच्या आकड्यामध्येही घोळ होत असल्याची बाबसमोर आली आहे. जुन्नरचे (Junner) आमदार अतुल बेनके (atul benke) यांच्या सोशल मीडिया प्रमुखालाच कोविड यादीमध्ये चक्क मृत दाखवण्यात आलं आहे. कोविड काळात आधीच आमदार खासदार यांनी तालुक्यातील जनतेला कसं वाऱ्यावर सोडलं आहे याची चर्चा होत होती आता तर त्यांच्याच कार्यकर्त्याला मृत दाखवल्याने आमदार अतुल बेनके यांच्यावरच विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले आहे. maharashtra corona case : राज्यात कोरोनाचा हाहाकार, मृतांची आकडेवारी वाढली याबाबत सविस्तर वृत्त असे की, आळेफाटा येथील विजय भिका कुऱ्हाडे हे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे सोशल मीडिया प्रमुख आहेत. त्यांनी नुकतीच कोविड उपचार घेतला होता. पण त्याच दरम्यान रुग्णालयात विजय बबन कुऱ्हाडे यांच कोविडमुळे निधन झालं. मात्र, प्रशासनाने विजय भिका कुऱ्हाडे यांनाच मृत घोषित केलं आहे. विजय भिका कुऱ्हाडे यांना मृत दाखवलेच पण त्यांच्या नावापुढे त्यांचा मोबाईल सुद्धा टाकायला विसरले नाहीत. राज्याला remdesivir चा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार पण, प्रशासनाच्या या चुकीवर बोट ठेवत विरोधकांनी नेहमी प्रमाणे या मुद्याचे भांडवल करत सोशल मीडियात "का ओ शेठ?" असा मेसेज फॉरवर्ड करत आमदार अतुल बेनके यांच्यावर टीका केली आहे.  या मेसेजमुळे स्थानिक पातळीवर कोरोना काळात सुद्धा राजकारण पेटलं आहे.
Published by:sachin Salve
First published: