जुन्नर, 21 जानेवारी : पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junner) तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील कुकडी नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये मच्छीमारांच्या जाळ्यात दुर्मिळ जातीचा मासा सापडला आहे. फिकट पिवळ्या रंगाच्या या माशाच्या शरीरावर खवले नसून काटे आहेत. तसेच काळ्या व सोनेरी रंगाची सुंदर नक्षी व चमकदार डोळे आहेत.
शिरोली बुद्रुक येथील सुभाष भांगरे या मच्छीमाराच्या जाळ्यात एक आगळावेगळा मासा मच्छीमार व नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे. भांगरे व त्याचे कुटुंबीय अनेक वर्षापासून वडिलोपार्जित मासेमारी व्यवसाय करतात.
परंतु, यापूर्वी कधी अशा प्रकारचा मासा त्यांनी पाहिला नसल्याचे सांगितले. साधारणपणे अर्धा किलो पेक्षा जास्त वजन असलेला हा जिवंत मासा त्यांनी आपल्या घरी आणून पाण्याच्या टबमध्ये ठेवला असून त्याचे संगोपन शेततळे किंवा विहिरीत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर झाडली गोळी; Tiktok वर झाली होती मैत्री
हा मासा 'सकर फिश' असल्याचं प्राणी शास्त्र विभागाच्या अभ्यासकांचं मत आहे. माशाला जबडा नसून वर्तुळाकार तोंड असते त्याद्वारे तो त्याचे अन्न शोषून घेतो. या प्रजातीच्या माशांची पैदास या परिसरात होत नसून तो पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आला असावा, असं प्राणी शास्त्राच्या अभ्यासकांचं मत आहे.
आंबोली-दोडामार्गाच्या जंगलात आढळले दुर्मिळ माकड!
दरम्यान, महाराष्ट्र (Maharashtra) राज्याला मोठी वनसंपदा लाभलेली आहे. त्यातच दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याच्या हद्दीत पश्चिम घाटामध्ये तर घनदाट जंगल आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हे घनदाट जंगल आढळत आणि याच भागात एका दुर्मिळ माकडाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 452 पदांसाठी भरती, वाचा कधीपर्यंत करू शकता अर्ज
'स्लेन्डर लोरीस' (red slender loris monkey) किंवा लाजवंती (lajwanti monkey )म्हणून या दुर्मिळ माकडाला ओळखलं जातं. स्थानिक वन्य प्रेमींना या लाजवंती माकडाचे दर्शन आंबोली दोडामार्ग या परिसरातल्या जंगलात झाले असून वन्य प्रेमींसाठी ही खुशखबर म्हणावी लागेल. लाजवंती हे माकड निशाचर असून ते अत्यंत हळुवार हालचाल करते. हुबेहूब एखाद्या लहान मुलासारखे दिसणारे हे माकड असल्यामुळे त्याला वनमानव म्हणूनही संबोधले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.