मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणेकरांनो, काळजी घ्याच! पुण्यातील रुग्णालयांबाबत धक्कादायक चित्र समोर

पुणेकरांनो, काळजी घ्याच! पुण्यातील रुग्णालयांबाबत धक्कादायक चित्र समोर

पुणे विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याचं वास्तव समोर आलं आहे.

पुणे विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याचं वास्तव समोर आलं आहे.

पुणे विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याचं वास्तव समोर आलं आहे.

पुणे, 20 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात मिनी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. परंतु, शहरातील परिस्थितीत किती बिकट आहे याचे चित्र समोर आले आहे. पुण्यात एकही बेड कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. पुण्यातील रुग्णालयांमध्ये आयसीयू व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नसल्याची माहिती समोर आली आहे. पुणे विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. कोरोनाबाबत IIT मुंबईच्या अहवालामुळे मुंबईसह राज्याला मोठा दिलासा एकीकडे पुण्यात वाढत चाललेली कोरोनाबाधितांची आकडेवारी आणि दुसरीकडे बेड्सच शिल्लक नसल्यामुळे पुणेकरांनी कुठे उपचार घ्यावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. धक्कादायक म्हणजे, मागील आठवड्यात एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा बेड न मिळाल्यामुळे मृत्यू ओढावला होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जागा मिळावी, यासाठी आता कठोर पाऊल उचलण्यात आले.  पुण्यात खाजगी रूग्णालयांमध्ये बेड्स अडवून बसलेल्या asymptotic रुग्णांना घरी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे हाल,रत्नागिरीतला धक्कादायक प्रकार पुण्यात एकीकडे सामान्य कोरोना रुग्णांना उपचार मिळत नाहीत तर दुसरीकडे खासगी रूग्णालयांमधून अतिसौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना अकारण बेड्स अडवून बसल्याच्या तक्रारी आहेत. म्हणूनच  खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये कोरोनाबाधित म्‍हणून उपचार घेत असलेल्‍या तथापी, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्‍य लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांचे समुपदेशन करुन  त्‍यांना घरी पाठविण्‍यात यावे, असे आदेश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी काढले आहे. खाजगी रुग्‍णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरावर तपासणी पथक स्‍थापन करण्‍यात आले असून या पथकामार्फत तपासणी करण्‍यात येणार आहे. जर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले किंवा सौम्‍य लक्षणे असलेले रुग्‍ण खाजगी रुग्णालयात आढळून आले तर संबंधित रुग्‍णालयाच्‍या प्रशासनावर साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्यानुसार, कार्यवाही करण्‍यात येईल, असा इशाराही जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 51,585 वर दरम्यान, पुणे जिल्ह्यात लॉकडाउन लागू केल्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रात्रीतून 473 रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 51,585 वर पोहोचली आहे. तर 1343 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या