मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

...मग उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा, काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान

...मग उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा, काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान

या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे

या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे

'केंद्राने तेल कंपन्यांना सूट दिल्यामुळे तेल कंपन्यांना फायदा झाला, नागरिकांचे त्यामुळे कंबरडे मोडले.

पुणे, 18 जुलै: कोरोना काळात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) पुन्हा एकदा देशात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले आहे त्यामुळे त्यांना पंतप्रधान करा' असं वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chauhan) यांनी केलं आहे.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आलं. यावेळी  मोदी सरकारच्या विरोधात इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी सायकल रॅली, रस्त्यावर चूल मांडून निषेध केला. यावेळी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला असतांना पेट्रोल डिझेल आणि गॅसवर करवाढ करून दरवाढ केली आहे. वर्षभरात पेट्रोल 23 टक्के वाढ, डिझेल 28 घरघुती गॅसमध्ये 41 टक्के वाढ झाली असून 66 वेळा ही दरवाढ केली आहे.  केंद्राच्या धोरणामुळे सातत्याने दरवाढ झाली आहे.  राज्यात कर मात्र स्थिर आहे.  केंद्राच्या धोरणामुळे सातत्याने दरवाढ झाली, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

कल्याण स्टेशनवरील Shocking Video; रेल्वे चालकाने मरणाच्या दारातून केली सुटका

भाजपचे विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलतात हे मी म्हणत नाही. तर आकडेवारी सांगत आहे. मी आकडे मांडली आहे. ते मुख्यमंत्री असतांना काय निर्णय घेतले? हे सर्वांना माहिती आहे, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधान करा', असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पण, असं म्हणत असताना चव्हाण यांना राहुल गांधी यांचा विसर पडला.

कुत्रे सोडल्या सारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडायच्या? दोषी ठरल्यावर कारवाई करा, आधीच्या काळात असं होतं नव्हतं. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. पण दुसऱ्या कुण्या नेत्याला प्रवेश दिला की भाजपात धुतल्या तांदळासारखे होते, आणि नंतर काय झालं? अशी टीकाही चव्हाण यांनी भाजपवर केली.

आइसक्रीम देण्याच्या बहाण्यानं चिमुकलीला बोलावलं अन्...; 28 वर्षीय आरोपीला अटक

'केंद्राने तेल कंपन्यांना सूट दिल्यामुळे तेल कंपन्यांना फायदा झाला, नागरिकांचे त्यामुळे कंबरडे मोडले. पेट्रोल आणि डfझेलची तीच परिस्थिती झाली. महागाई मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे साडेबारा कोटी लोकांचे रोजगार गेले. देशातील 23 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली गेले आहे.  आमच्या सरकारने 14 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून बाहेर काढले होते. कोरोनाच्या आधीपासून महागाई सुरू झाली होती, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

First published:

Tags: Maharashtra, Mumbai, Prithviraj Chavan, Pune, Uddhav thacakrey